ETV Bharat / business

Adani FPO Story : अदानींनी स्वत:च्याच कंपन्यांमार्फत एफपीओमध्ये पैसे गुंतवले का? वाचा सविस्तर - Hindenburg research

अदानी ग्रुपची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसने 20,000 कोटी रुपयांच्या फॉलो ऑन पब्लिक ऑफर (FPO) रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. फोर्ब्सच्या म्हणण्यानुसार, अदानी ग्रुपच्या त्या दोन कंपन्यांनीही एफपीओमध्ये पैसे गुंतवले होते, ज्यांचा उल्लेख हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालात करण्यात आला आहे.

Adani
अदानी
author img

By

Published : Feb 3, 2023, 9:24 AM IST

नवी दिल्ली : अमेरिकन इन्व्हेस्टमेंट रिसर्च फर्म हिंडेनबर्गच्या अहवालानंतर गौतम अदानी यांच्या मालकीच्या अदानी समूहाचे शेअर्स घसरत आहेत. गुरुवारीही त्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले. अदानी एंटरप्रायझेसची 20,000 कोटी रुपयांचे फॉलो-ऑन पब्लिक ऑफरिंग (FPO) बुधवारी अचानक रद्द करण्यात आले. यावर गुंतवणूकदारांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, त्यांचे पैसे परत केले जातील, असे समूहाच्या वतीने सांगण्यात आले आहे. दरम्यान, २० हजार कोटींच्या एफपीओबाबत फोर्ब्सचा अहवाल समोर आला आहे. त्यात एफपीओवर देखील प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. या संपूर्ण प्रकरणी विरोधक सरकारला घेराव घालत आहेत. यावर भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनीही ट्विट केले आहे.

फोर्ब्सचा अहवाल : फोर्ब्सच्या अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की, ज्या दोन कंपन्यांनी अदानी समूहाला शेअर्समध्ये फेरफार करण्यास मदत केली होती त्या या एफपीओ मध्ये अंडररायटर होत्या. फोर्ब्सच्या अहवालात नमूद केलेल्या कंपन्यांमध्ये लंडनस्थित गुंतवणूक फर्म एलारा कॅपिटल आणि मोनार्क नेटवर्थ कॅपिटल या भारतीय ब्रोकरेज फर्मच्या उपकंपनी आहेत. कॅपिटलच्या इंडिया अपॉर्च्युनिटीज फंडाने सार्वजनिकरीत्या सुमारे $3 अब्ज किमतीच्या शेअर्सचा व्यापार केला आहे. यामध्ये अदानी एंटरप्रायझेसचेही शेअर्स आहेत. हिंडेनबर्गच्या अहवालानुसार, मोनार्क नेटवर्थ कॅपिटल ही भारतीय ब्रोकरेज फर्म आहे. हे 2016 पासून अंशतः अदानी प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकीचे आहे. एलारा कॅपिटल आणि मोनार्क नेटवर्थ कॅपिटलच्या शेअर्समुळे अदानीच्या कोणत्याही खाजगी निधीचा वापर $2.5 अब्ज डॉलर्सची उद्दिष्टपूर्ती करण्यात केला होता की नाही, याबद्दल प्रश्न निर्माण होतो.

अदानीने एफपीओ मागे घेतला : अदानी एंटरप्रायझेसने बुधवारी त्यांचे 20,000 कोटी रुपयांचे फॉलो-ऑन पब्लिक ऑफरिंग (एफपीओ) मागे घेण्याची आणि गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याची घोषणा केली. मात्र, मंगळवारी कंपनीचा एफपीओ पूर्णपणे सबस्क्राइब झाला होता. अमेरिकेतील शॉर्टसेलिंग कंपनी हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी एंटरप्रायझेसने हे पाऊल उचलल्याचे समजते. बीएससीच्या आकडेवारीनुसार, अदानी एंटरप्रायझेसच्या एफपीओ अंतर्गत 4.55 कोटी शेअर्स ऑफर करण्यात आले होते, तर 4.62 कोटी शेअर्ससाठी अर्ज प्राप्त झाले होते. गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव असलेल्या 96.16 लाख शेअर्ससाठी जवळपास तिप्पट बोली प्राप्त झाल्या. त्याच वेळी, पात्र संस्थात्मक खरेदीदारांचे 1.28 कोटी समभाग पूर्णतः सबस्क्राइब झाले. तथापि, किरकोळ गुंतवणूकदार आणि कंपनी कर्मचार्‍यांकडून एफपीओला मिळणारा प्रतिसाद सौम्य होता.

रिझर्व्ह बँकेने कर्जाचा तपशील मागितला : भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) कर्जदारांना म्हणजे बँकांना अदानी समूहाला दिलेल्या कर्जाचा तपशील मागितला आहे. बँकिंग सूत्रांनी सांगितले की, मोठ्या कर्ज डेटाच्या माहितीनुसार, आरबीआय नियमितपणे बँकांच्या मोठ्या कॉर्पोरेट कर्जदारांचे तपशील मागते. बँका कधीकधी तारण ठेवलेल्या सिक्युरिटीजवर कर्ज देतात आणि अदानी समूहाच्या 10 सूचीबद्ध कंपन्यांच्या इक्विटी शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्यामुळे तारण ठेवलेल्या सिक्युरिटीजचे मूल्य देखील कमी होऊ शकते. दुसरीकडे, स्विस कर्जदार क्रेडिट सुइसने बुधवारी मार्जिन कर्जासाठी हमी म्हणून अदानी समूहाच्या कंपन्यांचे रोखे स्वीकारणे बंद केले. एवढेच नाही तर क्रेडिट सुइसनंतर अमेरिकेच्या सिटी ग्रुपनेही अदानी समूहाच्या कंपनीची लँडिंग व्हॅल्यू काढून टाकली आहे.

काँग्रेसची चौकशीची मागणी : अदानी समूहावरील हिंडेनबर्गच्या अहवालावरून विरोधक सरकारला घेराव घालत आहेत. काँग्रेसने याबाबत चौकशीची मागणी केली आहे, तर भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनीही सरकारला सल्ला दिला आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट केले, माझा मोदींना सल्ला आहे की नकारात्मक मोबदल्यासाठी अदानी अँड कंपनीच्या संपूर्ण व्यावसायिक मालमत्तेचे राष्ट्रीयीकरण करा आणि नंतर संपत्तीचा लिलाव करा. दुसर्‍या ट्विटमध्ये ते म्हणाले, माझा विश्वास आहे की मोदी सरकार हळूहळू अदानींना पाठीशी घालत आहे.

अदानींच्या प्रतिष्ठेला ठेच : बंदर ते ऊर्जा क्षेत्रापर्यंतच्या विस्तृत व्यावसायिक समूहाचे प्रमुख गौतम अदानी जगातील अव्वल अब्जाधीशांच्या यादीत मागे पडले आहेत. एका आठवड्यापूर्वी फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीत जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले अदानी बुधवारी 15 व्या स्थानावर घसरले. फोर्ब्स वेबसाइटनुसार, अदानी यांच्या संपत्तीत गेल्या वर्षी 44 अब्ज डॉलरची वाढ झाली होती. मात्र गेल्या एका आठवड्यात त्यांची संपत्ती झपाट्याने कमी झाली आहे. ते सध्या जागतिक अब्जाधीशांच्या यादीत 75.1 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह 15 व्या क्रमांकावर आहेत.

कोण आहे हिंडेनबर्ग रिसर्च? : अदानी समूहाच्या कंपन्यांवर गंभीर अनियमिततेचे आरोप करणारी अमेरिकन आर्थिक संशोधन कंपनी हिंडनबर्ग रिसर्च सहा वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली होती. जगातील मोठ्या कंपन्यांमधील शेअर्सची अनियमितता शोधणे हा त्यांचा प्रमुख उद्देश आहे. कनेक्टिकट विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय व्यवसाय व्यवस्थापनाचा अभ्यास केलेलले नॅथन अँडरसन यांनी 2017 मध्ये या फॉरेन्सिक आर्थिक संशोधन कंपनीचा पाया घातला होता.

काय आहे हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालात? : काही दिवसांपूर्वी हिंडेनबर्ग या अमेरिकन फर्मने जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील समूहाच्या कंपन्यांचा अहवाल प्रसिद्ध केला होता. अदानी ग्रुपची प्रातिनिधिक कंपनी अदानी एंटरप्रायझेसच्या 20,000 कोटी रुपयांच्या फॉलो-ऑन पब्लिक ऑफरिंग (FPO) च्या आधी हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. अहवालात अदानी समूह अनेक दशकांपासून ओपन स्टॉक मॅनिपुलेशन आणि अकाउंटिंग फ्रॉड मध्ये गुंतलेला आहे, असे आरोप करण्यात आले आहेत. हिंडेनबर्ग रिसर्चने कोणताही संशोधन न करता हा अहवाल जारी केला आहे, असे सांगून अदानी समूहाने हा अहवाल फेटाळला आहे. आपल्या 413 पानांच्या उत्तरात अदानी समूहाने म्हटले आहे की, हिंडेनबर्ग अहवाल अमेरिकन कंपनीला आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी आमच्यावर खोटे आरोप करत आहे.

हेही वाचा : Hindenburg Report : अदानी समूहाच्या वेगवान व्यवसायाला धक्का देणार्‍या 'अ‍ॅम्ब्युलन्स ड्रायव्हर'ची कहाणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.