ETV Bharat / business

Hindenburg Fallout : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका, अदानी ग्रुपकडून हजारो कोटींचा पेट्रोकेमिकल प्रकल्प स्थगित! - Petrochemical Plant at Mundra

हिंडेनबर्गचा अहवाल येऊन जवळपास दोन महिने झाले असले तरी त्याचा फटका अदानी समूहावर कायम आहे. त्याचा नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी आणि गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी समूह अनेक मोठे निर्णय घेत आहे. या मालिकेत पेट्रोकेमिकल प्रकल्प बंद करण्याचा निर्णय देखील समाविष्ट आहे.

Adani
अदानी
author img

By

Published : Mar 20, 2023, 10:09 AM IST

नवी दिल्ली : हिंडेनबर्गच्या अहवालामुळे अदानी समूहाला चांगलाच फटका बसला आहे. हा अहवाल आल्यानंतर अदानी एंटरप्रायझेसवरील गुंतवणूकदारांचा विश्वास कमी होऊ लागला आहे. परिणाम: त्यांचे शेअर्स देखील घसरू लागले आहेत. या समस्येवर मात करण्यासाठी अदानी समूह अनेक मोठे निर्णय घेत आहे, ज्याद्वारे गुंतवणूकदारांचा विश्वास पुन्हा जिंकता येईल. याच मालिकेत अदानी समूहाने आता गुजरातच्या मुंद्रा येथील 34,500 कोटी रुपयांच्या पेट्रोकेमिकल प्रकल्पाचे काम थांबवले आहे. त्याऐवजी समूह गुंतवणूकदारांच्या समस्यांचे निराकरण करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.

मुंद्रा पेट्रोकेम प्रकल्प काय आहे? : अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसने 2021 मध्ये अदानी पोर्ट्सच्या जमिनीवर पीव्हीसी प्लांट उभारण्यासाठी मुंद्रा पेट्रोकेम उपकंपनी सुरू केली होती. गुजरातमधील कच्छमध्ये हा प्लांट उभारला जाणार होता. मात्र हिंडेनबर्ग अहवालामुळे अदानी समूहाला हा प्रकल्प रद्द करावा लागला आहे. अदानी समूहाने मात्र हिंडेनबर्गचे हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ते सध्या गुंतवणुकदारांचे पैसे परत करण्याला प्राधान्य देत आहेत. या प्रक्रियेअंतर्गत रोख प्रवाह आणि चालू वित्ताचे मूल्यांकन केले जात आहे. त्यामुळेच अदानी ग्रुप आता मुंद्रा प्रकल्प पुढे नेण्याच्या मनस्थितीत नाही. ग्रुपने एक मेल पाठवून मुंद्रा पेट्रोकेम लिमिटेडला पुढील सूचना मिळेपर्यंत ग्रीन पीव्हीसी प्रकल्पाशी संबंधित सर्व काम तात्काळ थांबवण्यास सांगितले आहे. कोणता प्रकल्प सुरू ठेवायचा आहे आणि कोणाची टाइमलाइन सुधारणे आवश्यक आहे याचे कंपनी मूल्यांकन करत आहे.

अदानी समूहाचे निवेदन : अदानी समूहाने म्हटले आहे की, आम्ही येत्या काही महिन्यांत प्राथमिक उद्योग स्तरावरील विकास प्रकल्पांच्या स्थितीचे मूल्यांकन करू. समूहाच्या प्रवक्त्याने सांगितले की, 'आमच्या स्वतंत्र पोर्टफोलिओ कंपन्यांची बॅलन्सशीट खूप मजबूत आहे. आमचे कार्पोरेट प्रशासन मजबूत आहे. त्याचबरोबर मालमत्ता सुरक्षित असून रोख प्रवाह देखील मजबूत आहे. आमच्या व्यवसाय पूर्णपणे फंडेड आहे. आम्ही आधीच तयार केलेल्या रणनीतीवर फोकस करत आहे'.

हेही वाचा : TCS CEO Rajesh Gopinathan : कोण आहेत राजेश गोपीनाथन, ज्यांनी दिला टीसीएसच्या सीईओ पदाचा राजीनामा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.