नवी दिल्ली - घाऊक बाजारपेठेत किमतीवर आधारित महागाईने उच्चांक गाठला आहे. घाऊक बाजारपेठेत महागाई ही एप्रिलमध्ये १०.४९ टक्के राहिली आहे. क्रूड ऑईल आणि उत्पादित वस्तुंच्या वाढत्या किमतीने ही महागाई वाढली आहे.
मार्चमध्ये घाऊक बाजारपेठेत महागाईचे प्रमाण ७.३९ टक्के होते. तर गतवर्षी एप्रिलमध्ये महागाईचे प्रमाण उणे १.५७ टक्के होते. यंदा सलग चौथ्या महिन्यात घाऊक बाजारपेठेत महागाईचे प्रमाण वाढले आहे. एप्रिल २०२१ मध्ये घाऊक बाजारपेठेतील महागाईवर आधारित वार्षिक महागाईचा दर हा १०.४९ राहिला आहे. क्रूड पेट्रोलियम, पेट्रोल, डिझेड यांचे वाढलेले दर आणि गतवर्षीच्या तुलनेत उत्पादित वस्तुंचे वाढलेले दर या कारणांनी एप्रिल २०२१ मध्ये महागाई वाढली आहे. असे निरीक्षण केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने नोंदविले आहे.
हेही वाचा-होंडाकडून मोफत सेवेसह वॉरंटीमध्ये ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ
अशी राहिली एप्रिलमध्ये घाऊक बाजारपेठेत महागाई-
- अन्नाच्या वर्गवारीत महागाईचे प्रमाण ४.९२ टक्के राहिले आहे.
- प्रथिनयुक्त अंडी, मांस आणि मासे महागल्याने अन्नाच्या वर्गवारीत महागाईचे प्रमाण वाढले.
- पालेभाज्यांच्या दरात ९.०३ टक्क्यांची घसरण झाली आहे. तर मार्च २०२१ मध्ये पालेभाज्यांच्या दरात ५.१९ टक्के घसरण झाली होती.
- अंडी, मांस व मासे यांच्यामधील महागाईचे प्रमाण हे एप्रिलमध्ये १०.८८ टक्के राहिले आहे.
- डाळींमधील महागाईचे प्रमाम १०.७४ टक्के तर फळांमधील महागाईचे प्रमाण २७.४३ टक्के राहिले.
- इंधन आणि वीज यामधील महागाईचे प्रमाण एप्रिलमध्ये २०.९४ टक्के राहिले. तर उत्पादित वस्तुंमधील महागाईचे प्रमाण हे ९.०१ टक्के राहिले.
हेही वाचा-अपोलो रुग्णालयाकडून हैदराबादमध्ये 'स्पूटनिक व्ही' देण्याकरिता नियोजन सुरू
घाऊक बाजारपेठेतील महागाईत वाढ
ग्राहक किंमत निर्देशांकावर (सीपीआय) आधारित किरकोळ बाजारपेठेतील महागाई ही एप्रिलमध्ये घसरून ४.२९ टक्के नोंदविण्यात आली होती. याची आकडेवारी मागील आठवड्यात जाहीर करण्यात आली आहे. कच्च्या मालाच्या किमती वाढत असल्याच्या दबावातून घाऊक बाजारपेठेतील महागाई वाढत असल्याचे आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी महिन्याच्या सुरुवातीलाच म्हटले होते.