नवी दिल्ली - व्होडाफोन आयडियाला तिसऱ्या तिमाहीत सुमारे ६,४३८.८ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. या निराशाजनक कामगिरीनंतर व्होडाफोनचे शेअर १८.३० टक्क्यांची घसरण झाली आहे.
व्होडाफोन आयडियाचे शेअर १८.३० टक्क्यांनी घसरून प्रति शेअर ३.६६ रुपये झाले आहेत. निफ्टीच्या शेअरमध्ये १८.८८ टक्क्यांची घसरण होवून प्रति शेअर ३.६५ टक्के झाले आहेत. दूरसंचार विभागाचे थकित शुल्क द्यावे, असे दूरसंचार कंपन्यांना सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले होते. त्यानंतर कंपनीच्या नफ्यात घसरण झाली आहे. गेल्या तीन महिन्यात कंपनीचे उत्पन्न ५ टक्क्यांनी घसरले आहे. एजीआरचे व्होडाफोनकडे कोट्यवधी रुपये थकित आहे.
हेही वाचा-अवमान प्रकरणी कारवाई का करू नये, दूरसंचार कंपन्यांना 'सर्वोच्च' विचारणा
सर्वोच्च न्यायालयाने २४ ऑक्टोबर २०१९ ला दूरसंचार कंपन्यांना थकित शुल्क भरण्याचे आदेश दिले होते. एअरटेलकडे एजीआरचे ३५,५८६ कोटी रुपये थकित आहेत. तर व्होडाफोन आयडियाकडे ५२,०३९ कोटी रुपये थकित आहेत. व्होडाफोन आयडिया, भारती टेलिकॉम आणि टाटा टेलिसर्व्हिसेसकडे एकूण १.०२ लाख कोटी रुपये थकित आहेत.
हेही वाचा-घाऊक बाजारपेठेतील महागाईत वाढ; जानेवारीत ३.१ टक्क्यांची नोंद