नवी दिल्ली - राजधानीतील आझादपूर या घाऊक बाजारपेठेत टोमॅटोचे दर प्रति किलो 1 रुपयापर्यंत कोसळले आहेत. याचबरोबर कांदे आणि पालेभाज्यांचे दरही घसरले आहेत.
राजधानीतील आझादपूर ही आशियातील फळे आणि पालेभाज्यांची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. किरकोळ विक्रेत्यांची संख्या घटल्याने टोमॅटोचे दर घसल्याचे बाजारातील विक्रेते आणि दलाल यांनी सांगितले. ओखला मंडीचे लेखापरीक्षक विजय आहुजा म्हणाले, की केवळ टोमॅटोच नाही तर हिरव्या पालेभाज्यांचे दर एक रुपया प्रति किलोपर्यंत कमी झाले आहेत.
हेही वाचा-'या' कंपनीत ३१९ कोटींच्या गुंतवणुकीनंतरही २००हून अधिक कर्मचाऱ्यांवर संक्रात
दिल्लीमधील लाखो लोक स्थलांतरित झाल्याने पालेभाज्यांचे दर घसरले आहेत. बाजारातील मागणी कमी झाल्याने पालेभाज्यांचे दर कमी झाल्याचे इंडियन मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र शर्मा यांनी सांगितले. टाळेबंदीमुळे रेस्टॉरंट, ढाबा हे बंद झाल्याने पालेभाज्यांच्या मागणीत घसरण झाली आहे. बाजारात टोकन पद्धत सुरू केल्याने ग्राहकांना खूप वेळ रांगेत थांबावे लागते. त्यामुळे बाजारात येणाऱ्या ग्राहकांचेही प्रमाण कमी झाले आहे.
हेही वाचाविषमतेचे चित्र : अमेरिकेत लाखो बेरोजगार; अब्जाधीशांच्या संपत्तीत ४३४ अब्ज डॉलरची वाढ