ETV Bharat / business

एकाच दिवसात शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांच्या भांडवली मूल्यात ७ लाख कोटींची भर!

बीएसईच्या आकडेवारीनुसार गुरुवारी सूचीबद्ध कंपन्यांचे भांडवली मूल्य गुरुवारी १३८.५४ लाख कोटी होते. आजच्या आकडेवारीनुसार सूचीबद्ध कंपन्यांचे भांडवली मूल्य आज हे १४५.३६ लाख कोटी रुपये झाले. या कंपन्यांचे भांडवली मूल्य हे ७ लाख कोटी रुपयाने वाढले आहे.

संपादित
author img

By

Published : Sep 20, 2019, 8:17 PM IST

हैदराबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने आज १ लाख ४५ हजार कोटींची कॉर्पोरेट सवलत जाहीर केली आहे. या निर्णयाने शेअर बाजाराचा निर्देशांक १८०० अंशाने वधारल्याने कंपन्यांचा चांगला फायदा झाला आहे. शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांच्या भांडवली मूल्यात ७ लाख कोटींची भर पडली आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कॉर्पोरेट दरात कपात, सीएसआर खर्चाच शिथीलता असे निर्णय घेतले. या निर्णयाला संसदेची मंजुरी लागत असते. सरकारने अधिसूचना काढून कायद्यात बदल करून कर सवलत जाहीर केली आहे. शेअर बाजारामध्ये सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांचे भांडवली मूल्य हे ६ लाख ८२ हजार ९३८.६ कोटींवरून १ कोटी ४५ लाख ३७ हजार ३७८.०१ रुपये झाले.

हेही वाचा-शेअर बाजारासह निफ्टीने गेल्या दहा वर्षाचा 'हा' मोडला विक्रम

देशातील कंपन्यांचा कॉर्पोरेट कर हा २२ टक्क्यापर्यंत कमी करण्यात आला आहे. तर नव्या कंपन्यांना १५ टक्के कर लागू होणार आहे. तर कंपन्यांना सीएसआर हा सरकारी संस्था, विद्यापीठ व आयआटीसारख्या संस्थांसाठी खर्च करता येणार आहे.

या कर सवलतीला गुंतवणुकदारांनी चांगला प्रतिसाद दिला. शेअर बाजार निर्देशांक वधारून २ हजार २८४.५५ या विक्रमी अंशावर पोहोचला होता. निफ्टीचा निर्देशांक ५६९.४० अंशाने वधारून ११,२७४.२० वर पोहोचला होता. बीएसईच्या आकडेवारीनुसार गुरुवारी सूचीबद्ध कंपन्यांचे भांडवली मूल्य गुरुवारी १३८.५४ लाख कोटी होते. आजच्या आकडेवारीनुसार सूचीबद्ध कंपन्यांचे भांडवली मूल्य आज हे १४५.३६ लाख कोटी रुपये झाले. या कंपन्यांचे भांडवली मूल्य हे ७ लाख कोटी रुपयाने वाढले आहे.

हेही वाचा-कॉर्पोरेट करातील कपातीने शेअर बाजाराची विक्रमी २२०० अंशाची उसळी! उद्योगातही उत्साह

काय असते भांडवली मूल्य-
भांडवली मूल्य = कंपन्यांचे एकूण असलेले शेअर X एका शेअरची किंमत

जसे कंपनीच्या शेअरचे मूल्य बदलते. तसेच भांडवली मूल्य बदलते. शेअरची किंमत मोठ्या फरकाने वाढल्याने आज कंपन्यांचे भांडवली मूल्य वाढले आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.