ETV Bharat / business

STOCK MARKET : रशिया-युक्रेन युद्धाने शेअर बाजारात पडझड; ट्रेडिंग सुरु होताच मोठी घसरण, निफ्टीही कोसळला - INDIAN STOCK MARKET

रशिया युक्रेन युद्धाचा जागतिक घडामोडींचा परिणाम होऊन मुंबई शेअर बाजार आज १४०० अंकांनी घसरला. निफ्टी मध्येही ३५८ अंकांची घसरण पाहायला मिळाली आहे.

STOCK MARKET
शेअर बाजार कोसळला
author img

By

Published : Mar 7, 2022, 11:23 AM IST

मुंबई - मुंबई शेअर बाजारात सकारात्मक सुरुवात झाल्यानंतर काही मिनिटातच शेअर बाजारात घसरण सुरू झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सुमारे चौदाशे अंकांनी घसरला. निफ्टीमध्ये 458 अंकांची घसरण झाली आहे.

युद्धाचा शेअर बाजारावर परिणाम

रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्धाचा थेट परिणाम मुंबई शेअर बाजारावर आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दिसला. आठवड्याचा पहिलाच दिवस, शेअर बाजारासाठी काळा सोमवार ठरला आहे. अनेक कंपन्यांचे शेअर गडगडले असून बाजारात मंदीचे वातावरण दिसत आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर होत असून त्याचा शेअर बाजारावर सर्वात जास्त परिणाम दिसून येत आहे. क्रूड ऑइलची किंमतीही गगनाला भिडली असून प्रती बॅरल एकशे पस्तीस डॉलर इतकी पोहोचली आहे. डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे स्थान आणखीन घसरले असून नीचांकी घसरण झाली आहे.

जागतिक शेअर बाजारातही पडझड

जागतिक शेअर बाजारातही रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम आता दिसू लागला आहे. जागतिक शेअर बाजारात शेअर्स विक्रीवर मोठा दबाव येतो आहे . निक्केईमध्येही घसरण झाली असून हँगसँग ७६८ अंकांनी कोसळला आहे. तैवानचा निर्देशांकही ५६० अंकांनी घसरला आहे. तर, शांघाई शेअर बाजाराच्या निर्देशांकातही १.४५ टक्क्यांनी घसरण पाहायला मिळत आहे. जागतिक शेअर बाजारात सर्वत्र पडझड पाहायला मिळते आहे.

हेही वाचा : Russia-Ukraine war LIVE Updates : पंतप्रधान मोदी आज झेलेन्स्की आणि पुतीन यांच्याशी फोनवर चर्चा करणार, युद्धाचे प्रत्येक अपडेट फक्त एका क्लिकवर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.