हैदराबाद – कोरोना महामारीत मागणी वाढल्याने देशातून निर्यात होणाऱ्या मसाल्यांच्या प्रमाणात जूनमध्ये 34 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदा जूनमध्ये 2 हजार 721 कोटी रुपयांची मसाल्यांची निर्यात झाली आहे. गतवर्षी जूनमध्ये मसाल्याची एकूण 2 हजार 721 कोटी रुपयांची निर्यात झाली होती.
कोरोनाच्या महामारीमुळे बहुतांश उत्पादनांच्या निर्यातीत घसरण झाली आहे. असे असले तरी मसाल्यांच्या निर्यातीत लक्षणीय वाढ झाल्याचे अॅसोचॅमच्या आकडेवारीत दिसून आले आहे. यंदा जूनमध्ये गतवर्षीच्या तुलनेत एकूण 12.4 टक्क्यांनी निर्यातीत घसरण झाली आहे. कोरोना महामारीमुळे जगभरातील लोक आरोग्याकडे प्राधान्याने लक्ष देत आहे. त्यामुळे मसाल्यांची निर्यात वाढली आहे.
कृषी निर्यात विश्लेषक आणि केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाचे माजी सचिव डॉ. परशुराम पाटील म्हणाले की, कोरोना महामारीमुळे संपूर्ण आहाराचे नियोजन बदलले आहे. प्रतिकारक्षमतेवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. लोकांना त्यांची नैसर्गिकपणाने प्रतिकारक्षमतेने वाढविण्याची इच्छा आहे. त्यामुळे मसाल्यांची जगभरातून मागणी वाढली आहे. देशामध्ये असामान्य वातावरणामुळे विविध मसाल्यांचे उत्पादन शक्य आहे. जगातील कोणत्याही देशात भारताएवढ्या विविध मसाल्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत नाही.
मसाला निर्यातीत भारत जगात प्रथम
लवंग, फूलपत्र, हळद व मसाल्यांचे तेल आदी मसाल्यांच्या निर्यातीत भारत हा जगातील सर्वात मोठा देश आहे. भारतामधून व्हिएतनाम, चीन, अमेरिका, बांग्लादेश, मलेशिया, संयुक्त अरब अमिराती, इंडोशिनिया, थायलंड आणि इराणमध्ये सर्वाधिक मसाल्यांची निर्यात होते. दरम्यान, देशामधील बाजारपेठांमध्ये मसाल्यांच्या किमती जूनमध्ये 12 टक्क्यांनी वाढल्या आहेत.