ETV Bharat / business

पेट्रोल-डिझेलच्या महगाईचा 'भडका' थांबेना...सलग आठव्या दिवशी दरवाढ - डिझेल किंमत न्यूज

सार्वजनिक तेल विपणन कंपन्यांच्या माहितीनुसार पेट्रोलचे दर प्रति लिटर ३५ पैसे तर डिझेलचे दर ३० पैशांनी वाढले आहेत. या दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोलचा दर प्रति लिटर ८९.२९ रुपये आहे.

पेट्रोल डिझेल दरवाढ न्यूज
पेट्रोल डिझेल दरवाढ न्यूज
author img

By

Published : Feb 16, 2021, 5:06 PM IST

Updated : Feb 16, 2021, 10:46 PM IST

नवी दिल्ली - पेट्रोल-डिझेलचे दर सलग आठव्या दिवशी देशभरात वाढले आहेत. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढल्याने देशात इंधनाचे दर वाढले आहेत.

सार्वजनिक तेल विपणन कंपन्यांच्या माहितीनुसार पेट्रोलचे दर प्रति लिटर ३५ पैसे तर डिझेलचे दर ३० पैशांनी वाढले आहेत. या दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोलचा दर प्रति लिटर ८९.२९ रुपये आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर ७९.७० रुपये आहे. मागील सात दिवसात पेट्रोलचे दर प्रति लिटर २.३६ रुपयांनी वाढले आहेत. तर डिझेलचे दर प्रति लिटर २.९१ रुपयांनी वाढले आहेत.

पेट्रोल-डिझेलच्या महगाईचा 'भडका' थांबेना.

हेही वाचा-महागाईत आणखी भडका: घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ५० रुपयाने वाढ

  • विविध राज्यांत स्थानिक कराचे प्रमाण भिन्न आहे. त्यामुळे पेट्रोलच्या किमती विविध शहरांमध्ये प्रति लिटर २६ ते ३२ पैशांनी वाढल्या आहेत. तर डिझेलच्या किमती प्रति लिटर ३० ते ३५ पैशांनी वाढल्या आहेत.
  • मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर ९५.७५ रुपये असल्याने शंभरीजवळ पोहोचले आहे. डिझेलचे दर प्रति लिटर ८६.७२ रुपये आहे.
  • देशातील इतर महानगरांमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर ९० रुपयांहून अधिक आहेत. तर डिझेलचे दर दिल्लीत प्रति लिटर ८० रुपयांहून अधिक आहेत.
  • राजस्थान, मध्यप्रदेशसह विविध राज्यांमध्ये प्रिमीयम पेट्रोलचे दर प्रति लिटर १०० रुपयांहून अधिक आहेत. तर महाराष्ट्रात प्रिमीयम पेट्रोलचे दर प्रति लिटर शंभर रुपयांजवळ पोहोचले आहेत.
  • पेट्रोल आणि डिझेलचे दर २०२१ मध्ये २१ वेळा वाढविण्यात आले आहेत. या दरवाढीने पेट्रोल २०२१ मध्ये प्रति लिटर ५.५८ रुपयांनी महागले आहे. तर डिझेल प्रति लिटर ५.८३ रुपयांनी महागले आहे.
  • देशातील बहुतेक महानगर आणि शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीने उच्चांक गाठला आहे.

हेही वाचा-घाऊक बाजारपेठेत २.०३ टक्क्यांनी वाढली महागाई

या कारणाने पेट्रोल आणि डिझेलमध्ये झाली दरवाढ-

सौदी अरेबियाने कच्च्या तेलाच्या बॅरलचे उत्पादन कमी केले आहे. दुसरीकडे कोरोनाच्या संकटातून जगभरातील देश सावरत आहेत. त्यामुळे कच्च्या तेलाची जगभरातून मागणी वाढत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत.

Last Updated : Feb 16, 2021, 10:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.