मुंबई - शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर ८७१ अंशाने घसरला आहे. जागतिक बाजारातील नकारात्मक स्थिती आणि विविध कंपन्यांच्या शेअरची विक्री या कारणांनी शेअर बाजार निर्देशांक ढासळला आहे.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर ८७१.१३ अंशाने घसरून ४९,१८०.३१ वर स्थिरावला आहे. तर निफ्टीचा निर्देशांक २६५.३५ अंशाने घसरून १४,५४९.४० वर स्थिरावला आहे.
हेही वाचा-सोन्याच्या दरात प्रति तोळा १४९ रुपयांची घसरण; चांदीचे दरही उतरले!
या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर
एम अँड एमचे सर्वाधिक सुमारे ४ टक्क्यांनी शेअर घसरले आहेत. त्यापाठोपाठ स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, इंडसइंड बँक, आयटीसी आणि एनटीपीसीचे शेअर घसरले आहेत. तर एशियन पेंट्स आणि पॉवरग्रीडचे शेअर वधारले आहेत. जागतिक बाजारातील नकारात्मक स्थितीने शेअर बाजार निर्देशांकात घसरण झाल्याचे रिलायन्स सिक्युरिटीजचे प्रमुख रणनीतीकार विनोद मोदी यांनी सांगितले. तसेच देशात कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत असल्याने गुंतवणुकदारांची चिंता वाढल्याचेही मोदी यांनी सांगितले.
हेही वाचा-टाळेबंदी घोषणेची वर्षपूर्ती : देशातील बेरोजगारीचे संकट कायमच
दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर २.७८ टक्क्यांनी वधारून प्रति बॅरल ६२.४८ डॉलर आहेत.