ETV Bharat / business

शेअर बाजार निर्देशांकात ४०० अंशाने पडझड

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर ४००.३४ अंशाने घसरून ५१,७०३.८३ वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक १०४.५५ अंशाने घसरून १५,२०८.९० वर स्थिरावला.

मुंबई शेअर बाजार
मुंबई शेअर बाजार
author img

By

Published : Feb 17, 2021, 5:14 PM IST

मुंबई - शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर ४०० अंशाने घसरला आहे. एचडीएफसी ट्विन्स, कोटक बँक आणि टीसीएस या मोठ्या कंपन्यांचे शेअर घसरले आहेत. त्याचा फटका शेअर बाजाराला बसला आहे.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर ४००.३४ अंशाने घसरून ५१,७०३.८३ वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक १०४.५५ अंशाने घसरून १५,२०८.९० वर स्थिरावला.

हेही वाचा-मूल्याकंनापलीकडे जाऊन विचार करा- पंतप्रधानांचा स्टार्टअप संस्थापकांना सल्ला

या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर

नेस्ले इंडियाचे सर्वाधिक सुमारे ३ टक्क्यांनी शेअर घसरले आहेत. त्यापाठोपाठ बजाज फिनसर्व्ह, एशियन पेंट्स, इंडसइंड बँक, मारुती, एचडीएफसी ट्विन्स आणि डॉ. रेड्डीज कंपनीचे शेअर घसरले आहेत. दुसरीकडे स्टेट बँक ऑफ इंडिया, पॉवरग्रीड, एनटीपीसी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर वधारले आहेत.

हेही वाचा-सोन्याची झळाळी फिक्की; प्रति तोळा ७१६ रुपयांची घसरण

रिलायन्स सिक्युरिटीजचे प्रमुख रणनीतीतज्ज्ञ विनोद मोदी म्हणाले की, आयटी, औषधी कंपन्या आणि एफएमसीजीमध्ये गुंतवणूकदारांनी नफा नोंदविला आहे. तर शेअर बाजार गुंतवणूकदारांनी सार्वजनिक बँकांच्या शेअरची गुंतवणूक करण्यासाठी रस दाखविला आहे. त्यामुळे सार्वजनिक बँक निर्देशांक ६ टक्क्यांहून अधिक वधारला आहे.

दरम्यान, जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर ०.५८ टक्क्यांनी वधारून ६३.७१ प्रति बॅरल राहिले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.