ETV Bharat / business

अर्थसंकल्पाला गुंतवणुकदारांचा सकारात्मक प्रतिसाद; शेअर बाजारात १५०० अंशाने उसळी

कोरोना महामारीतून देशाची अर्थव्यवस्था सावरण्यासाठी केंद्र सरकारकडून सुधारणांचा कार्यक्रम सुरुच राहिल, अशी शेअर बाजार गुंतवणूकदारांना अपेक्षा आहे. अशातच शेअर बाजाराचा निर्देशांक वधारला आहे.

शेअर बाजार
शेअर बाजार
author img

By

Published : Feb 1, 2021, 9:42 AM IST

Updated : Feb 1, 2021, 1:40 PM IST

मुंबई - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प सादर करतानाच शेअर बाजाराने अनुकूल प्रतिसाद दिला आहे. शेअर बाजारात १ हजार अंशाने उसळी घेतली आहे. तर अर्थसंकल्प सादर केल्यानंतर शेअर बाजाराचा निर्देशांक १५०० अंशाने वधारला आहे.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ९२९.५४ अंशाने वधारून ४७,१२५.३१ अशांवर वधारला आहे. तर निफ्टीचा निर्देशांक २६०.०५ अंशाने वधारून १३,८९४.६५ वर स्थिरावला.

शेअर बाजारात इंडसइंड बँकेचे सर्वाधिक शेअर वधारले आहेत. आयसीआयसीय बँक, एचडीएफसी, बजाज फिन्सर्व्ह, एम अँड एम आणि एसबीआयचे शेअर वधारले आहेत. तर डॉ. रेड्डीज, टेक महिंद्रा, टीसीएस आणि एचसीएल टेकचे शेअर घसरले आहेत.

केंद्रीय अर्थमंत्र्यांनी भांडवली खर्चात ३४.५ टक्क्यांनी वाढ करून ५.४ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्याची जाहीर केले आहे. तसेच सार्वजनिक बँकांसाठी २० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे.

अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी शेअर बाजारात सकारात्मक चित्र राहिले आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ४८३ अंशाने वधारला आहे. बाजार खुला होताना निर्देशांक ४४३ अंशाने वधारून ४६,७२८.८३ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक ११४.८५ अंशाने वधारून १३,७४९.४५ वर स्थिरावला.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक खुला होताना इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, ओएनजीसी, टायटन आणि एचडीएफसीचे बँक शेअर वधारले आहेत. मागील सहा सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ३,५०६.३५ अंशाने घसरला. तर निफ्टीचा निर्देशांक १,०१०.१० अंशाने घसरला.

कोरोना महामारीतून देशाची अर्थव्यवस्था सावरण्यासाठी केंद्र सरकारकडून सुधारणांचा कार्यक्रम सुरुच राहिल, अशी शेअर बाजार गुंतवणूकदारांना अपेक्षा आहे.

हेही वाचा-सीतारमण यांच्या पोतडीतून काय मिळणार? अर्थसंकल्पाकडे देशाचे लक्ष

कोरोनाविरोधात लसीकरणाची देशात मोहिम सुरू झाली आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटातून देश बाहेर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देशाचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल शुक्रवारी सादर झाला. या आर्थिक सर्वेक्षणात देशाचा विकासदर पुढील आर्थिक वर्षात ११ टक्के राहिल, असा अंदाज केला आहे.

हेही वाचा-अर्थव्यवस्थेला दिलासा! जानेवारीत विक्रमी जीएसटी संकलन!

जीएसटीच्या संकलनात वाढ-

कोरोनामुळे जबरदस्त फटका बसलेल्या अर्थव्यवस्थेसाठी नव्या वर्षाचा पहिला महिना दिलासादायक ठरला आहे. २०२१ च्या जानेवारीत जीएसटी संकलन १ लाख २० हजार कोटींच्या विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. अर्थसंकल्प सादर होत असताना आलेली ही आकडेवारी सरकारसाठी दिलासायादक असल्याचे बोलले जात आहे.

Last Updated : Feb 1, 2021, 1:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.