ETV Bharat / business

शेअर बाजार निर्देशांक १७० अंशाने वधारला; बँकांच्या शेअरमधील तेजीचा परिणाम

बँकिंगचे शेअर वधारल्याने मुंबई शेअर बाजार निर्देशांक सकाळच्या सत्रात १७० अंशाने वधारला.

संग्रहित - शेअर बाजार
author img

By

Published : Nov 19, 2019, 12:35 PM IST

मुंबई - रिलायन्स इंडस्ट्रीज, भारती एअरटेल, एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँकेचे शेअर सकाळच्या सत्रात वधारले. त्यामुळे शेअर बाजार निर्देशांक १७० अंशाने वधारला. निफ्टीचा निर्देशांक १४ अंशाने वधारून ११,८१८.५० वर पोहोचला.

या कंपन्यांचे शेअर वधारले-घसरले
भारती एअरटेल, टेक महिंद्रा, रिलायन्स इंडस्ट्रीज अॅक्सिस बँक, पॉवरग्रीड, इन्फोसिस, येस बँक आणि एचडीएफसी बँकेचे शेअर ५ टक्क्यापर्यंत घसरले. वेदांत, एचयूएल, हिरोमोटोकॉर्प, एम अँड एम, टीसीएस, ओएनजीसी आणि टाटा स्टीलचे शेअर हे २ टक्क्यापर्यंत घसरले.

हेही वाचा-व्होडाफोन आयडियाचे रिचार्ज १ डिसेंबरपासून महागणार

मुंबई शेअर बाजार निर्देशांक सोमवारी ७२.५० अंशाने घसरून ४०,२८४.१९ वर स्थिरावला होता, तर निफ्टीचा निर्देशांक १०.९५ अंशाने घसरून ११,८८४.५० वर स्थिरावला होता.
मागील सत्रात विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी भांडवली बाजारात २७०.६६ कोटींच्या शेअरची विक्री केली. तर देशातील गुंतवणूकदार संस्थांनी ३०९.४५ कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली.

Intro:Body:

Dummy Business News

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.