ETV Bharat / business

ऐतिहासिक! शेअर बाजाराने दिवसाखेर ओलांडला ५२ हजारांचा टप्पा

author img

By

Published : Feb 15, 2021, 4:36 PM IST

अ‌ॅक्सिस बँकेचे शेअर सर्वाधिक ६ टक्क्यांनी वधारले. त्यापाठोपाठ आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, स्टेट बँक ऑफ इंडिया, इंडसइंड बँक, एचडीएफसी आणि कोटक बँकेचे शेअर वधारले.

शेअर बाजार
शेअर बाजार

मुंबई - शेअर बाजाराने आज ५२ हजारांचा टप्पा ओलांडून ऐतिहासिक उच्चांक नोंदविला आहे. दिवसाखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ६१० अंशाने वधारून ५२,२३५.९७ वर स्थिरावला.

निफ्टीचा निर्देशांक दिवसाखेर १५१.४० अंशाने वधारून १५,३१४.७० वर स्थिरावला.

या कंपन्यांचे वधारले-घसरले शेअर

अ‌ॅक्सिस बँकेचे शेअर सर्वाधिक ६ टक्क्यांनी वधारले. त्यापाठोपाठ आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, स्टेट बँक ऑफ इंडिया, इंडसइंड बँक, एचडीएफसी आणि कोटक बँकेचे शेअर वधारले. तर डॉ. रेड्डीज, टीसीएस, टेक महिंद्रा, एचयूएल आणि एशियन पेंट्सचे शेअर घसरले.

हेही वाचा-सरकारी आणि इतर क्रिप्टोचलन एकाचवेळी स्वतंत्रपणे चालू शकतात-आयएएमएआय

आनंद राठी या कंपनीचे मुख्य संशोधक नरेंद्र सोळंकी म्हणाले की, शेअर बाजार खुला होताना निर्देशांक वधारला होता. तर महागाईची आकडेवारी जाहीर झाल्यानंतर दुपारीही शेअर बाजाराचा निर्देशांक वधारला आहे.

अशी आहे अर्थजगतामधील स्थिती-

  • डिसेंबर २०२० मध्ये किरकोळ बाजारपेठेत महागाईचे प्रमाण हे ४.५९ टक्के राहिले आहे. सलग दुसऱ्या महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) हा आरबीआयच्या उद्दिष्टाप्रमाणे ६ टक्क्यांहून कमी राहिला आहे.
  • आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर १.३० टक्क्यांनी वधारून प्रति बॅरल ६३.२४ डॉलर राहिले आहेत.

हेही वाचा-पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग सातव्या दिवशी वाढ

५२ हजारांचा ऐतिहासिक उच्चांक

सोमवारी सकाळी व्यवहार सुरू होताच बाजारात उत्साहाचे वातावरण बघायला मिळाले. बीएसई आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकात मोठी उसळी सकाळच्या सत्रात बघायला मिळाली. बीएसईच्या निर्देशांकात ४६३ अंकांची वाढ होऊन निर्देशांक प्रथमच ५२,००८ अंकांवर पोहोचला. नंतरही निर्देशांकात वाढ होत राहिली. सकाळच्या सत्रात निर्देशांक ५२४ अंकांनी वधारून ५२,०६८ अंकांवर पोहोचला होता. तर निफ्टीत १३८ अंकांची वाढ होऊन निर्देशांक १५,३०२ अंकांवर पोहोचला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.