ETV Bharat / business

सलग सहा दिवसांच्या पडझडीनंतर ५१ अंशाने वधारून सावरला शेअर बाजार

author img

By

Published : Jul 26, 2019, 5:28 PM IST

विदेशी गुंतवणुकदारांनी भांडवली बाजारातून काढून घेतलेल्या निधीमुळे गुंतवणूकदार चिंतित असल्याचे बाजार विश्लेषकांनी सांगितले.

शेअर बाजार

मुंबई - गेल्या सहा दिवसांच्या पडझडीनंतर शेअर बाजार आज किंचितसा सावरला आहे. निर्देशांक ५१.८१ अंशाने वधारून ३७,८८२.७९ वर पोहोचला. निफ्टीचा निर्देशांक ३२.१५ अंशाने वधारून ११,२८४.३० वर पोहोचला.

'या' कंपन्यांचे शेअर घसरले-वधारले

येस बँकेचे शेअर ९.६४ टक्क्यांनी वधारले. तर बजाज फायनान्सचे शेअर ७.२० टक्क्यांनी वधारले आहेत. बजाज फायनान्सने आजपर्यंत सर्वात अधिक म्हणजे १ हजार १९५ कोटींचा नफा जूनच्या तिमाहीत मिळविला आहे. हिरोकॉर्प, एम अँड एम, बजाज ऑटो, टाटा मोटर्स, एशियन पेंट्स आणि कोटक बँकेचे शेअर हे ३.२१ टक्क्यापर्यंत वधारले आहेत.

वेदांत, रिलायन्स इंडस्ट्रीज, भारती एअरटेल, ओएनजीसी, एचडीएफसी, टेक महिंद्रा, एचसीएल टेक आणि इन्फोसिसचे शेअर सर्वात अधिक ४.२६ टक्क्यांनी घसरले आहेत.

विदेशी गुंतवणुकदारांनी भांडवली बाजारातून काढून घेतलेल्या निधीमुळे गुंतवणूकदार चिंतित असल्याचे बाजार विश्लेषकांनी सांगितले. दरम्यान, डॉलरच्या तुलनेत ७ पैशांनी वधारून रुपया ६८.९७ वर पोहोचला आहे.

Intro:Body:

news3

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.