ETV Bharat / business

सलग पाच दिवसांच्या तेजीला ब्रेक; शेअर बाजार निर्देशांकात १४४ अंशाने घसरण - शेअर बाजार अपडेट न्यूज

मुंबई शेअर बाजार निर्देशांक १४३.६२ अंशाने घसरून ४५,९५९.८८ वर स्थिरावला. निफ्टीचा निर्देशांक ५०.८० अंशाने घसरून १३,४७८.३० वर स्थिरावला.

मुंबई शेअर बाजार
मुंबई शेअर बाजार
author img

By

Published : Dec 10, 2020, 4:51 PM IST

मुंबई- सलग पाच दिवस वधारलेल्या शेअर बाजार निर्देशांकाला आज ब्रेक लागला आहे. मुंबई शेअर बाजार निर्देशांक १४४ अंशाने घसरला आहे. एचडीएफसी ट्विन्स, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि आयसीआयसीआय बँकेचे शेअर घसरले आहे.

मुंबई शेअर बाजार निर्देशांक १४३.६२ अंशाने घसरून ४५,९५९.८८ वर स्थिरावला. निफ्टीचा निर्देशांक ५०.८० अंशाने घसरून १३,४७८.३० वर स्थिरावला.

हेही वाचा-बँकांची आरटीजीएस सेवा १४ डिसेंबरपासून २४X७

या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर

अल्ट्राटेक सिमेंटचे सर्वाधिक ३ टक्क्यांनी शेअर घसरले आहेत. त्यापाठोपाठ एम अँड एम, एचडीएफसी बँक, इंडसइंड बँक, अॅक्सिस बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर घसरले आहेत. तर दुसरीकडे नेस्ले इंडिया, आयटीसी, एचयूएल आणि कोटक बँकेचे शेअर वधारले आहेत. नफा नोंदवून गुंतवणूकदारांनी शेअर विक्री केल्याचे ट्रेडर्सने म्हटले आहे. आनंद राठीचे मुख्य संशोधक नरेंद्र सोळंकी म्हणाले, की एशियन डेव्हलपमेंट बँकने (एडीबी) चालू आर्थिक वर्षात विकासदर उणे ८ टक्के राहिल, असा सुधारित अंदाज केला आहे. यापूर्वी एडीबीने विकासदर हा उणे ९ टक्के राहिल, असे म्हटले होते. अशा काही अहवालामुळे गुंतवणुकदारांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा-जळगावात पेट्रोलच्या दराने ओलांडला नव्वदीचा टप्पा; डिझेल 80.51 रुपये प्रति लिटर

दरम्यान, जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर ०.७६ टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल ४९.२३ डॉलर आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.