मुंबई - जागतिक आर्थिक मंचावर चिंतेची स्थिती असतानाही शेअर बाजार निर्देशांक वधारला आहे. शेअर बाजार निर्देशांकात सकाळी ११ वाजून ४० मिनिटांला ३८ अंशाची वाढ झाली. आयसीआयसीआय बँक, एल अँड टी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर वधारले आहेत. तर विदेशी गुंतवणुकीच्या निधीचे प्रमाण वाढले आहे.
शेअर बाजार निर्देशांक ३८.०४ अंशाने वधारून ३९,४७२.९८ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक हा १०.२० अंशाने वधारून ११,८०६.६५ वर पोहोचला. शेअर बाजाराला सुरुवात होताच पहिल्या १५ मिनिटांत निर्देशांक हा २०० अंशाने वाढला. मंगळवारी शेअर बाजार ३११.९८ अंशाने वधारून ३९,४३४.९४ वर पोहोचला होता. तर निफ्टीचा निर्देशांकही ९६.८० अंशाने वाढून ११,७९६ वर पोहोचला होता.
या कंपन्यांचे शेअर वधारले, यांचे घसरले
पॉवरग्रीड, एनटीपीसी, सन फार्मा, एल अँड टी, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, टाटा मोटर्स, एम अँड एम, वेदांत आणि ओएनजीसीचे शेअर हे २.२६ टक्क्यापर्यंत वधारले आहेत.
टाटा स्टील, बजाज फायनान्स, एचयूएल, टीसीएस, एचडीएफसी आणि इंडुसलँड बँकेचे शेअर हे ०.२६ टक्क्यापर्यंत घसरले आहेत.
मान्सूनमुळे शेअर बाजारात सकारात्मक चित्र-
अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने व्याजदरात कपात करण्याच संकेत दिले आहेत. तसेच अमेरिका आणि इराणमध्ये तणावाची स्थिती असल्याने जगभरातील गुंतवणुकदार चिंतेत आहेत, अशा नकारात्मक स्थितीतही शेअर बाजाराच्या निर्देशांकात वाढ झाली आहे. मान्सून हा टप्प्याटप्प्याने मध्य आणि उत्तर भारताच्या दिशेने प्रगती करत आहे. यामुळे शेअर बाजारात सकारात्मक चित्र असल्याचे बाजार विश्लेषकांनी सांगितले.