मुंबई - शेअर बाजाराचा निर्देशांक २५० अंशाने वधारला आहे. एल अँड टी, अॅक्सिस बँक आणि इन्फोसिसचे शेअर वधारल्याने शेअर बाजारात तेजी दिसून येत आहे.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक २३३.९२ अंशाने वधारून ४१,३४९.३० वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक ६०.८० अंशाने वधारून १२,१६७.७० वर पोहोचला. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत एल अँड टीच्या महसुलात १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर अॅक्सिस बँकेनेही चालू वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत ४.५ टक्के अधिक नफा मिळविला आहे. त्यामुळे लार्सन अँड टुर्बो आणि अॅक्सिस बँकेचे शेअर २.७७ टक्क्यापर्यंत वधारले.
हेही वाचा-विम्याची 'ती' रक्कम जीवनानंतर नव्हे जीवनातच; राज्य ग्राहक मंचाने एलआयसीला असा दिला दणका
वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) व्यवस्थापनासाठी सरकारबरोबर काम करत असल्याचे इन्फोसिसने जाहीर केले आहे. तर जीएसटीएन पोर्टलवर काम करत असल्याचेही इन्फोसिसने म्हटले आहे. त्यानंतर इन्फोसिसचे शेअर १.४४ टक्क्यांनी वधारले आहेत.
हेही वाचा-ग्राहकांना मोठा दिलासा; पेट्रोल-डिझेलचे दर आणखी उतरले
एचयूएल, नेस्ले, एशियन पेंट्स आणि टेक महिंद्राचे शेअर घसरले आहेत. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी १७६.४३ कोटी रुपयांचे शेअर बुधवारी विकले. तर देशातील गुंतवणूकदार संस्थांनी ३२६.२२ कोटी रुपयांचे शेअर विकले आहेत.