मुंबई - शेअर बाजार आज दिवसाखेर २४७ अंशाने वधारून ३८,१२७.०८ वर स्थिरावला आहे. जागतिक बाजारपेठेतील सकारात्मक चित्र आणि अमेरिका-चीनमधील व्यापारी वाद मिटण्याची शक्यता आहे. याचा मुंबई शेअर बाजारात सकारात्मक परिणाम दिसून आला.
मुंबई शेअर बाजार २४६.६८ अंशाने वधारून ३८,१२७.०८ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक ७०.५० अंशाने वधारून ११,३०५ वर पोहोचला.
हेही वाचा-शेअर बाजारात ४१४ अंशाची उसळी; अमेरिका-चीनमध्ये करार होण्याच्या शक्यतेचा परिणाम
या कंपन्यांचे शेअर घसरले-वधारले
शेअर बाजार निर्देशांक वधारल्याचा सर्वात अधिक इन्फोसिसच्या शेअरला फायदा झाला. इन्फोसिसचे शेअर ४.१९ टक्क्यांनी वधारले. वेदांत, टाटा मोटर्स, ओएनजीसी, टाटा स्टील, एचयूएल, एचसीएल टेक, टेक महिंद्रा आणि भारती एअरटेलचे शेअर ३.९६ टक्क्यापर्यंत वधारले. तर येस बँक, एम अँड एम, रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस, हिरो मोटोकॉर्प, इंडसइंड बँक आणि एनटीपीसीचे शेअर हे ३.३० टक्क्यापर्यंत घसरले.
हेही वाचा-७४० कोटींचे फसवणूक प्रकरण : सिंग बंधूंसह इतर आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी