मुंबई - केंद्र सरकार आणखी आर्थिक सुधारणा जाहीर करणार असल्याची शक्यता आहे. यामुळे शेअर बाजार निर्देशांक १२५ अंशाने वधारून बंद झाला. गेली काही दिवस घसरणारे बँक आणि ऑटो कंपन्यांचे शेअर वधारले.
शेअर बाजार निर्देशांक १२५.३७ अंशाने वधारून ३७,२७०.४२ वर बंद झाला. तर निफ्टी ३२.६५ अंशाने वधारून ११,०३५.७० वर बंद झाला.
येस बँकेचा हिस्सा विकत घेण्यासाठी पेटीएमची बँकेचे सहसंस्थापक राणा कपूर यांच्याबरोबर चर्चा सुरू आहे. याचा परिणाम म्हणूनयेस बँकेचे शेअर आज सर्वात अधिक १३.४७ टक्क्यांनी वधारले.
हेही वाचा-अर्थव्यवस्थेची विदेशी गुंतवणूकदार संस्थांवर भिस्त; भारतीय भांडवली बाजाराला बसत आहेत धक्के
या कंपन्यांचे शेअर घसरले-वधारले
टाटा मोटर्स, मारुती, टाटा स्टील, वेदांत, बजाज ऑटो, इंडुसइंड बँक, एसबीआय, हिरोमोटोकॉर्प, एम अँड एम, एशियन पेंट्स, अॅक्सिस बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एल अँड टीचे शेअर १०.२१ टक्क्यापर्यंत वधारले. ओएनजीसी, एचसीएल टेक, एनटीपीसी, सन फार्मा, टीसीएस, बजाज फायनान्स, पॉवरग्रीड, टेक महिंद्रा आणि इन्फोसिसचे शेअर हे २.९३ टक्क्यापर्यंत घसरले आहेत.
हेही वाचा-तणावपूर्ण संबंधातही पाकिस्तान भारताकडून या गोष्टीची करणार आयात
पायाभूत प्रकल्पात गुंतवणूक वाढविण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करण्यात आल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी सांगितले.