ETV Bharat / business

शेअर बाजारात उत्साह, ४० हजार अंशाचा टप्पा ओलांडला

शेअर बाजाराच्या सकाळच्या सत्रात निर्देशांक २७१.१२ अंशाने वाढून ४०,१०३.०९ वर पोहोचला. तर निफ्टीच्या निर्देशांकात ८१.२० अंशांची वाढ होऊन १२,०२७.१० वर पोहोचला आहे.

शेअर बाजार
author img

By

Published : May 31, 2019, 12:27 PM IST

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजारने ४० हजार अंशाचा टप्पा ओलांडला होता. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर दुसऱ्या दिवशी शेअर बाजाराने पुन्हा ४० हजार अंशाचा टप्पा ओलांडला. विदेशी गुंतवणुकीच्या निधीचा ओघ सुरू असल्याने बँकिंगसह आयटी कंपन्यांचे शेअर सकाळच्या सत्रात वधारले.

शेअर बाजाराच्या सकाळच्या सत्रात निर्देशांक २७१.१२ अंशाने वाढून ४०,१०३.०९ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक ८१.२० अंशाने वाढून १२,०२७.१० वर पोहोचला.

या कंपन्यांचे शेअर वधारले-उतरले
एशियन पेंट्स, कोल इंडिया, टीसीएस, ओएनजीसी, एचसीएल टेक, एल अँड टी, अॅक्सिस बँक, एसबीआय आणि इंडुसलँड बँकेचे शेअर ३ टक्क्यापर्यंत वधारले. तर, येस बँक, टाटा मोटर्स, एनटीपीसी, वेदांत, एम अँड एम आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर ०.३२ टक्क्यापर्यंत घसरले.

अर्थसंकल्प आणि आरबीआयचे पतधोरण ठरविणार शेअर बाजाराची पुढील दिशा -
लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर स्थिर आणि बहुमतामधील सरकार स्थापन होणार असल्याचे स्पष्ट झाले. तेव्हापासून ( २३ मे ) भांडवली बाजारात सातत्याने विदेशी गुंतवणूकदारांचा निधी येत आहे. येत्या काळातील सादर करण्यात येणारा अर्थसंकल्प आणि आरबीआयचे पतधोरण हे बाजाराची पुढील दिशा निश्चित करतील, असा बाजार विश्लेषकांचा अंदाज आहे. मार्च तिमाहीचा जाहीर करण्यात येणाऱ्या जीडीपीच्या आकडेवारीची गुंतवणूकदार वाट पाहत आहे, असेही एका व्यापाऱ्याने सांगितले.

विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी गुरुवारी सुमारे १ हजार ६६४.७४ कोटींच्या शेअरची खरेदी केली. तर देशातील गुंतवणूकदार संस्थांनी १ हजार १२२.६० कोटींच्या शेअर विक्री केली. गुरुवारी शेअर बाजाराच्या निर्देशांकात ३२९.९२ अंशाची वाढ होवून निर्देशांक ३९,८३१.९७ वर पोहोचला. निफ्टीच्या निर्देशांकात ८४.८० अशांची वाढ होवून ११,९४५.९० वर पोहोचला होता.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.