ETV Bharat / business

मुंबई शेअर बाजाराचा नवा ऐतिहासिक उच्चांक; ४९५ अंशाने वधारून ओलांडला ४६,००० चा टप्पा - Sensex today news

मुंबई शेअर बाजाराने आज दिवसभरात ४६,१६४.१० हा आजवरचा उच्चांक नोंदविला आहे. दिवसाखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ४९४.९९ अंशाने वधारून ४६,१०३.५० वर स्थिरावला. निफ्टीचा निर्देशांक १३६.१५ अंशाने वधारून १३,५९.१० वर स्थिरावला.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक
author img

By

Published : Dec 9, 2020, 4:48 PM IST

Updated : Dec 9, 2020, 5:19 PM IST

मुंबई - शेअर बाजाराचा निर्देशांक ४९५ अंशाने वधारून पहिल्यांदाच आज ४६,००० चा टप्पा ओलांडला आहे. विदेशी गुंतवणूकदारांचा ओघ आणि जागतिक बाजारातील सकारात्मक स्थिती या कारणांनी शेअर बाजारात तेजी निर्माण झाली आहे.

मुंबई शेअर बाजाराने आज दिवसभरात ४६,१६४.१० हा आजवरचा उच्चांक नोंदविला आहे. दिवसाखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ४९४.९९ अंशाने वधारून ४६,१०३.५० वर स्थिरावला. निफ्टीचा निर्देशांक १३६.१५ अंशाने वधारून १३,५९.१० वर स्थिरावला. तर निफ्टीनेही आजपर्यंतचा १३,५४८.९० हा उच्चांक नोंदविला आहे.

हेही वाचा-हेरिजकडून फ्युचर रिटेलमधील ३ टक्के हिश्श्याची विक्री; मिळाले १३२ कोटी रुपये

या कंपन्यांचे वधारले-घसरला शेअर

एशियन पेंट्सचे सर्वाधिक सुमारे ३ टक्क्यांनी शेअर वधारले. कोटक बँक, अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक, इन्फोसिस बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि आयटीसीचे शेअर वधारले. दुसरीकडे अल्ट्राटेक सिमेंट, टाटा स्टील, मारुती, एसबीआय आणि बजाज ऑटोचे शेअर घसरले.

  • जागतिक बाजारातील स्थितीमुळे निफ्टी आणि शेअर बाजाराने नवा उच्चांक गाठल्याचे रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुख्य रणनीतीकार विनोद मोदी यांनी सांगितले.
  • जगभरात कोरोनावरील लसीच्या संशोधनाला गती मिळाली आहे. त्यामुळे कोरोनाच्या भीतीचे सावट कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर गुंतवणुकदारांकडून शेअरची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात येत आहे.
  • विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी (एफपीआय) मंगळवारी २,९०९.६० कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रुड फ्युचरचे शेअर ०.९६ टक्क्यांनी वधारून प्रति बॅरल ४९.३१ डॉलर आहेत.

Last Updated : Dec 9, 2020, 5:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.