मुंबई - चालू वर्षातील पहिल्या तिमाहीत जीडीपी ५ टक्के एवढा कमी झाल्याचे मोठे पडसाद शेअर बाजारात उमटले आहेत. शेअरच्या विक्रीच्या दबावातून निर्देशांक ७६९ अंशाने घसरून ३६,५६२.९१ वर बंद झाला.
शेअर बाजार सकाळच्या सत्रात ४०० अंशाच्या घसरणीनंतर दिवसभरात सावरला नाही. सरकारी बँकांच्या विलिनीकरणाचा निर्णय केंद्रीय अर्थमंत्र्यांनी जाहीर केला. याला गुंतवणुकदारांनी नकारात्मक प्रतिसाद दिल्याने इंडियन बँक, पीएनबी बँक, कॅनरा बँक व युनियन बँकचे शेअर हे ९ टक्क्यापर्यंत घसरले. सर्व वाहन कंपन्यांचे शेअरही घसरले.
हेही वाचा-सरकारच्या विलिनीकरणाच्या घोषणेने सरकारी बँकांच्या शेअरची आपटी
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आयडीबीआयला ९ हजार कोटींची भांडवली अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर आयडीबीआयचे शेअर ८ टक्क्यांनी वधारले. निफ्टीचा निर्देशांक २२५.४० अंशाने घसरून १०,७९७.९० वर बंद झाला.
हेही वाचा-रुपया गडगडला! डॉलरच्या तुलनेत ६७ पैशांनी घसरून पोहोचला ७२.०९ वर
रुपयाचीही सकाळच्या सत्रात मोठी घसरण-
रुपयाची डॉलरच्या तुलनेत घसरण सुरुच आहे. रुपया सकाळच्या सत्रात ६७ पैशांनी घसरून ७२.०९ वर पोहोचला. शेअर बाजार निर्देशांकात सकाळच्या सत्रात सुमारे ४०० अंशाची घसरण व बँकांसह निर्यातदारांकडून डॉलरची झालेली मोठी मागणी या कारणांनी रुपयाची घसरण झाली आहे.
हेही वाचा-घसरलेल्या जीडीपीचा धक्का ; शेअर बाजार निर्देशांकात ४०० अंशाची पडझड