ETV Bharat / business

शेअर बाजार निर्देशांकात ४३४ अंशाची पडझड; बँकांच्या शेअरमध्ये मोठी घसरण

कमी केलेल्या रेपो दराचा लाभ ग्राहकापर्यंत पोहोचविण्यासाठी आरबीआयने लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे बँकांच्या नफ्यावर दबाव होणार असल्याचे शेअरखानचे भांडवली बाजार प्रमुख गौरव दुआ यांनी सांगितले.

संग्रहित - शेअर बाजार
author img

By

Published : Oct 4, 2019, 4:55 PM IST

मुंबई - निर्देशांकात ४३४ अंशाची पडझड होवून शेअर बाजार बंद झाला. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीत अर्थव्यवस्थेचा विकासदर पूर्वीच्या अंदाजाहून कमी होईल, असे म्हटले आहे. याचा सर्वात अधिक बँकांच्या शेअरला फटका बसला.

आरबीआयच्या चौथ्या तिमाही पतधोरणात रेपो दर हा ०.२५ टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे. हा निर्णय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आरबीआयने घेतला. शेअर बाजार सकाळच्या सत्रात ३०० अंशाने वधारला होता. मात्र, भारतीय रिझर्व्ह बँकेने पतधोरण जाहीर केल्यानंतर शेअर बाजारात नकारात्मक वातावरण दिसून आले.

शेअर बाजार निर्देशांक ४३३.५६ अंशाने घसरून ३७,६७३.३१ वर बंद झाला. तर निफ्टीचा निर्देशांक १३९.२५ अंशाने घसरून ११,१७४.७५ वर बंद झाला.

हेही वाचा-केंद्र सरकारकडून पैशाची मागणी झाल्याची माहिती नाही - आरबीआय गर्व्हनर

या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर
कोटक बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, टाटा मोटर्स, एल अँड टी, एसबीआय, टाटा स्टील आणि अॅक्सिस बँकेचे शेअर ३.४६ टक्क्यापर्यंत घसरले.

टीसीएस, इन्फोसिस, ओएनजीसी, टेक महिंद्रा, इंडसइंड बँक आणि एनटीपीसीचे शेअर १.०३ टक्क्यांनी वाढले. शेअर बाजारात वित्त, ऑटो आणि रिअ‌ॅल्टी कंपन्यांचे (स्थावर मालमत्ता) शेअर २.४५ टक्क्यापर्यंत घसरले.

हेही वाचा- पीएमसी घोटाळा: ईडीकडून मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्याची नोंद; मुंबईत सहा ठिकाणी छापे

या कारणामुळे शेअर बाजार निर्देशांकात झाली घसरण-
कमी केलेल्या रेपो दराचा लाभ ग्राहकापर्यंत पोहोचविण्यासाठी आरबीआयने लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे बँकांच्या नफ्यावर दबाव होणार असल्याचे शेअरखानचे भांडवली बाजार प्रमुख गौरव दुआ यांनी सांगितले. चालू वर्षात आरबीआयने १३५ बेसिस पाँईटने व्याजदरात कपात केली आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पतधोरणाबाबत कृती करण्यासाठी आरबीआयची क्षमता कमी होणार आहे. अशा स्थितीत आर्थिक विकासाच्या वृद्धीदराबाबत चिंता व्यक्त होत असल्याचेही दुआ यांनी सांगितले.

Intro:Body:

Dummy

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.