ETV Bharat / business

शेअर बाजार खुला होताना २५० अंशांनी वधारला निर्देशांक; 'या' कंपन्यांचे शेअर तेजीत

author img

By

Published : Apr 23, 2020, 10:29 AM IST

निफ्टीचा निर्देशांक ३०.४० अंशांनी वधारून ९,२१७.७० वर पोहोचला आहे. ओएनजीसीचे शेअर सर्वाधिक ३ टक्क्यापर्यंत वधारले आहेत. त्यापाठोपाठ टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक, टीसीएस आणि एल अँड टीचे शेअर वधारले आहेत.

शेअर बाजार
शेअर बाजार

मुंबई - शेअर बाजार खुला होताना निर्देशांक २५० अंशांनी वधारला आहे. बँकिंग, उर्जा आणि आयटी कंपन्यांचे शेअर तेजीत आल्याने मुंबई शेअर बाजार वधारला आहे.

निफ्टीचा निर्देशांक ३०.४० अंशांनी वधारून ९,२१७.७० वर पोहोचला आहे. ओएनजीसीचे शेअर सर्वाधिक ३ टक्क्यापर्यंत वधारले आहेत. त्यापाठोपाठ टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक, टीसीएस आणि एल अँड टीचे शेअर वधारले आहेत. तर दुसरीकडे टायटन, एम अँड एम, मारुती, पॉवरग्रीड, टेक महिंद्रा आणि एचडीएफसी बँकेचे शेअर घसरले आहेत.

हेही वाचा-व्हॉट्सअ‌ॅपची झुमला टक्कर; 'हे' आहे फीचर्स

मागील सत्रात मुंबई शेअर बाजार ७४२.८४ अंशांनी वधारून ३१,३७९.५५ वर स्थिरावला होता. तर निफ्टीचा निर्देशांक २०५.८५ अंशांनी वधारून ९,१८७.८४ वर स्थिरावला होता.

हेही वाचा- फेसबुकची जिओत ४३,५७४ कोटींची गुंतवणूक; उद्योग जगतामधून स्वागत

दरम्यान, कोरोनाच्या संकटातही फेसबुकने जिओमध्ये सुमारे ४४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी बुधवारी १,३२६.०९ कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली होती.

कोरोनाचे जगभरात थैमान-

जगभरात २६ लाख नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर १.८३ लाख जणांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाची २१,३९३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ६८१ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाने जगभरात हाहाकार केल्याने जगभरातील शेअर बाजारात सतत घसरण होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.