मुंबई - मुंबई शेअर बाजार सकाळच्या सत्रात २०६.७९ अंशाने वधारून ४०,४९३.२७ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक ५५.०५ अंशाने वधारून ११,९२७.१५ वर पोहोचला. सरकारी बँका, ऑटो आणि वित्तीय सेवा कंपन्यांचे शेअर वधारल्याचे दिसून आले.
या कंपन्यांचे वधारले-घसरले शेअर-
स्टेट बँक ऑफ इंडिया, टाटा मोटर्स, भारती एअरटेल, वेदांत, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक, टाटा स्टील, एम अँड एम, एचसीएल टेक आणि सन फार्माचे शेअर ३ टक्क्यापर्यंत वधारले. तर एचडीएफसी, एनटीपीसी, अॅक्सिस बँक आणि बजाज ऑटोचे शेअर ०.४२ टक्क्यापर्यंत घसरले. मुंबई शेअर बाजार गुरुवारी १७०.४२ अंशाने वधारून ४०,२८६.४८ वर स्थिरावला होता. तर निफ्टीचा निर्देशांक ३१.६५ अंशाने स्थिरावून ११,८८७२.१० वर स्थिरावला होता.
निफ्टी पीएसयू बँकेचा निर्देशांक ४ टक्क्यांनी वधारला. त्याचबरोबर ऑटो आणि वित्तीय सेवांचे शेअरही वधारले. शेअर बाजार खुला होताच भारती एअरटेलचे घसरलेले शेअर नंतर सावरले आहेत.
हेही वाचा-अमेरिका-चीन व्यापारी युद्धाचा असाही फायदा; चामडे उद्योगाला निर्यातीची प्रचंड संधी
दुसऱ्या तिमाहीत मोठ्या तोटा होवूनही भारती एअरटेलचे शेअर ५ टक्क्यांहून अधिक वधारले. सर्वोच्च न्यायालयाने दूरसंचार कंपन्यांना थकित पैसे दूरसंचार विभागाला दिले आहेत. त्यामुळे दुसऱ्या तिमाहीत दूरसंचार कंपन्यांच्या तोट्यात प्रचंड वाढ झाली आहे.