ETV Bharat / business

शेअर बाजारात पडझड; निर्देशांकात 983.58 अंशाची घसरण - Sensex today

एचडीएफसी ट्विन्सचे सर्वाधिक 4 टक्क्यांनी शेअर घसरले आहेत. त्यापाठोपाठ आयसीआयसीआय बँक, कोटक बँक, एशियन पेंट्स, एम अँड एम, एचयूएल, टीसीएस आणि मारुतीचे शेअर घसरले आहेत. कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी होईपर्यंत शेअर बाजार अस्थिर राहिल, असा तज्ज्ञांनी अंदाज व्यक्त केला.

Share Market
शेअर बाजार
author img

By

Published : Apr 30, 2021, 6:01 PM IST

मुंबई - सलग चार दिवस शेअर बाजाराचा निर्देशांक वधारत असताना आज मोठी पडझड झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर ९८४ अंशाने घसरला आहे. बहुतके आशियाई शेअर बाजाराची झालेली घसरण आणि वित्तीय कंपन्यांचे घसरलेले शेअर या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजाराला फटका बसला आहे.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर ९८३.५८ अंशाने घसरून ४८,७८२.३६ वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक २६३.८० अंशाने घसरून १४,६३१.१० वर स्थिरावला.

हेही वाचा-बनावट रेमडेसिवीर इंजेक्शनच्या कंपनीवर दिल्ली पोलिसांचा छापा, 5 जण जेरबंद

या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर

एचडीएफसी ट्विन्सचे सर्वाधिक ४ टक्क्यांनी शेअर घसरले आहेत. त्यापाठोपाठ आयसीआयसीआय बँक, कोटक बँक, एशियन पेंट्स, एम अँड एम, एचयूएल, टीसीएस आणि मारुतीचे शेअर घसरले आहेत. तर दुसरीकडे ओएनजीसी, सन फार्मा, डॉ. रेड्डीज आणि बजाज ऑटोचे शेअर वधारले आहेत.

हेही वाचा-सावधान.. लसीकरणावर भामट्यांची नजर, नागरिकांची होऊ शकते ऑनलाईन फसवणूक

काय आहे तज्ज्ञांचे मत ?

रिलायन्स सिक्युरिटीजचे वरिष्ठ रणनीतीतज्ज्ञ विनोद मोदी म्हणाले, की औषधे, धातू, आयटी वगळता सर्व क्षेत्रनिहाय निर्देशांकांतील कंपन्यांवर शेअर विक्रीचा दबाव दिसून आला. देशात कोरोनाबाधितांचे आणि त्यांच्या मृत्यूच्या वाढत्या प्रमाणाने राज्य व केंद्र सरकारची चिंता वाढला आहे. कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी होईपर्यंत शेअर बाजार अस्थिर राहिल, असा त्यांनी अंदाज व्यक्त केला.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेन्ट क्रूड तेलाचे दर १.३१ टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल ६७.१५ डॉलर आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.