ETV Bharat / business

शेअर बाजार निर्देशांकात अंशत: घसरण; गुंतवणुकदारांची सावध भूमिका - मुंबई शेअर बाजार

अमेरिका-चीनमध्ये पहिल्या टप्प्यात असलेला  व्यापारी करार अस्तित्वात आला आहे. त्यामुळे जगभरातील गुंतवणूकदारांमध्ये गेली काही दिवस उत्साह होता. मात्र, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील महाभियोगाच्या मंजुरीनंतर जगभरातील गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे.

Mumbai Share Market
मुंबई शेअर बाजार
author img

By

Published : Dec 19, 2019, 12:31 PM IST

मुंबई - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील महाभियोगावरील लोकप्रतिनिधी सभागृहात मंजुरी मिळाली आहे. यामुळे जगभरातील गुंतवणूकदारांनी सावधगिरीची भूमिका घेतली आहे. त्याचा परिणाम म्हणून शेअर बाजार आणि निफ्टीच्या निर्देशांकात घसरण झाली आहे.

मुंबई शेअर बाजार निर्देशांक २४.८९ अंशाने घसरून ४१,५३३.६८ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक ७.६० अंशाने घसरून १२,२१४.३० वर पोहोचला.
या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर-

येस बँकेचे शेअर सर्वाधिक २.४६ टक्क्यांनी घसरले. त्याचबरोबर इंडुसइंड बँक, आयसीआयसीआय बँक, सन फार्मा, एचडीएफसी, टाटा स्टील आणि भारती एअरटेलचे शेअर घसरले. एम अँड एमचे शेअर सर्वाधिक १.२६ टक्क्यांनी वधारले. एचसीएल टेक, टाटा मोटर्स, एशियन पेंट्स, टीसीएस आणि एचयूएलचे शेअरही वधारले.

हेही वाचा-टाटा सन्सच्या चेअरमन पदावर नियुक्ती देणाऱ्या निकालावर सायरस मिस्त्री म्हणाले...

मागील सत्रात मुंबई शेअर बाजार २.०६.४० अंशाने वधारून ४१,५५८.५७ वर स्थिरावला होता. हा आजपर्यंतचा सर्वोच्च निर्देशांक ठरला आहे. तर ५६.६५ अंशाने वधारून निफ्टीनेही १२,२२१.६५ हा विक्रमी निर्देशांक नोंदविला. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी बुधवारी १ हजार ८३६.८१ कोटी रुपयांच्या शेअरची गुरुवारी खरेदी केली. तर देशातील गुंतवणूकदार संस्थांनी १ हजार २६७.५७ कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली.

हेही वाचा-जीएसटी परिषद : करवाढ नाही, देशातील लॉटरीवर एकसमान दर लागू करण्याबाबत बहुमत

Intro:Body:

Dummy news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.