मुंबई - शेअर बाजार बंद होताना निर्देशांक ३७.६७ अंशाने वधारून ३९,०५८.०६ वर बंद झाला. तर निफ्टीचा निर्देशांक १.३० अंशाने वधारून ११,५८३.९० वर पोहोचला होता.
येस बँकेचे शेअर सर्वात अधिक ७.१९ टक्क्यांनी वधारले. स्टेट बँक ऑफ इंडियाने दुसऱ्या तिमाहीत चांगला नफा नोंदविला. त्याचा परिणाम म्हणून एसबीआयचे शेअर हे ७.१९ टक्क्यांनी वधारले आहेत.
आयसीआयसीआय बँक, सन फार्मा, टीसीएस, एचसीएल टेक, मारुती, भारती एअरटेल आणि इन्फोसिसचे शेअर हे ३.१८ टक्क्यांनी वधारले आहे. तर दुसरीकडे टाटा मोटर्स, वेदांत, एचडीएफसी, कोटक बँक, हिरो मोटोकॉर्प आणि एनटीपीसीचे शेअर हे ४.८७ टक्क्यांनी घसरले आहेत. तर इंडिगोचे शेअर हे १२ टक्क्यांनी घसरले आहेत. इंडिगोला दुसऱ्या तिमाहीत १ हजार ६२ कोटींचा तोटा झाला आहे.