मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात ३५.७८ अंशाने घसरून ३१,०३१.५५ वर पोहोचला. तर एनएसईच्या निफ्टी हा ६.५० अंशाची घसरण होऊन ११,७४८.१५ वर पोहोचला. याशिवाय इंडूसलँड बँक, हिरोमोटो कॉर्प, मारुती सुझुकी, पॉवरग्रीड आणि महिंद्रा आणि महिंद्राच्या शेअरमध्ये ५.२१ टक्क्यापर्यंत घसरण झाली. आज बँकिंग आणि ऑटो कंपन्यांच्या शेअरमध्ये सर्वाधिक घसरण झाल्याचे दिसून आले.
गृहकर्ज देणाऱ्या इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स, पीएनबी हाऊसिगं फायनान्स या कंपन्यांच्या शेअरमध्ये ६ टक्क्यापर्यंत घसरण झाली. चीनमधील उत्पादन मंदावल्याने आशियामधील बहुतेक शेअर मार्केटमध्ये आज घसरण झाल्याचे दिसून आले. अमेरिकेची मध्यवर्ती बँकेची फेडर ओपन मार्केट कमिटी बुधवारी आर्थिक धोरण निश्चित करणार आहे. यामुळे गुंतवणुकदारांनीही सावध पवित्रा घेतला आहे.