ETV Bharat / business

शेअर बाजार निर्देशांक २५० अंशाने वधारला; येस बँकेच्या शेअरमध्ये ८ टक्क्यांनी घसरण

डीएचएफएलचे शेअर सर्वात अधिक ९.८६ टक्क्यांनी घसरले आहेत. तर रेमंडचे शेअर सर्वात अधिक ७.६६ टक्क्यांनी वधारले आहेत.

संग्रहित - शेअर बाजार
author img

By

Published : Oct 9, 2019, 1:10 PM IST

मुंबई - शेअर बाजार निर्देशांक २५० अंशाने वधारून ३७,८२२ वर पोहोचला. इंडसइंड बँकेचे ४ टक्क्यांनी शेअर वधारले आहेत. तर येस बँकेचे शेअर ८ टक्क्यांनी घसरले आहेत.

निफ्टीचा निर्देशांक हा ११, २०० जवळ पोहोचला आहे. निफ्टीत वित्तीय सेवा देणाऱ्या कंपन्याव्यतिरिक्त सर्व शेअर निर्देशांक घसरले आहेत. निफ्टीच पीएसयू बँक आणि निफ्टी आयटीचे शेअर ५ टक्क्यांनी घसरले आहेत. डीएचएफएलचे शेअर सर्वात अधिक ९.८६ टक्क्यांनी घसरले आहेत. तर रेमंडचे शेअर सर्वात अधिक ७.६६ टक्क्यांनी वधारले आहेत.

शेअर बाजार निर्देशांक सकाळच्या सत्रात ३६.०४ अंशाने वधारून ३७,५६८.०२ वर पोहोचला होता. तर आयसीआयसीआय बँक, कोटक बँक, एल अँड टी, एम अँड एम, इंडसइंड बँक, एशियन पेंट्स, एचडीएफसी बँकचे शेअर १.३९ टक्क्यापर्यंत वधारले. तर येस बँक, एचसीएल टेक, ओएनजीसी, हिरो मोटोकॉर्प, टीसीएस, टाटा स्टील, इन्फोसिसचे शेअर हे ८.३३ टक्क्यांनी घसरले. दसऱ्यानिमित्त बुधवारी शेअर बाजार बंद होता. सोमवारी शेअर बाजार १४१.३३ अंशाने घसरून ३७,५३१.९८वर पोहोचला होता.

असे आहे आर्थिक चित्र-

  • जागतिक स्पर्धात्मक निर्देशांकात भारताचे स्थान १० अंकाने घसरून ६८ व्या क्रमांकावर पोहोचले आहे.
  • चीन-अमेरिकतील व्यापार युद्धावर अजूनही तोडगा निघाला नसल्याने जागतिक गुंतवणूकदार चिंतेत आहेत.
  • अर्थव्यवस्था मंदावली असतानाही ई-कॉमर्स कंपन्या फ्लिपकार्ट व अ‌ॅमेझॉनने केवळ ६ दिवसात १९ हजार कोटींचा व्यवसाय केला आहे.

Intro:Body:

 dummy

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.