ETV Bharat / business

मुंबई शेअर बाजार ८१० अंशांनी कोसळला; कोरोनाचे सावट कायम

शेअर बाजार विश्लेषकांच्या मते, बाजारात चढ-उतार होत असला तरी गुंतवणूकदारांना आर्थिक मंदी येण्याची भीती आहे.

शेअर बाजार
शेअर बाजार
author img

By

Published : Mar 17, 2020, 12:10 PM IST

Updated : Mar 17, 2020, 4:03 PM IST

मुंबई - शेअर बाजार निर्देशांक सकाळच्या सत्रात सावरला असताना दिवसाखेर पुन्हा घसरला आहे. मुंबई शेअर बाजार निर्देशांक ८१० अंशांनी घसरून ३०,५७९ वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक २३० अंशांनी घसरून ८,९६६ वर स्थिरावला.

गेली काही दिवस पडझड सुरू असताना शेअर बाजारात सकाळच्या सत्रात निर्देशांक ५०० अंशांनी वधारला होता. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी मंदावलेल्या अर्थव्यवस्थेवर उपाय करण्यासाठी सर्व पर्याय तयार असल्याचे सोमवारी सांगितले.

मुंबई शेअर बाजार खुला झाल्यानंतर ४७५.४५ अंशांनी वधारून ३१,८६५.५२ वर निर्देशांक पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक १६३ अंशांनी वधारून ९,३६०.४० वर पोहोचला. मागील सत्रात मुंबई शेअर बाजारात २,७१३.४१ अंशांनी पडझड होवून निर्देशांक ३१,३९०.०७ वर स्थिरावला होता. तर निफ्टीचा निर्देशांक ७५७.८० अंशांनी घसरून ९,१९७.४० वर स्थिरावला होता.

हेही वाचा-येस बँकेच्या कामकाजाची गाडी बुधवारपासून येणार रुळावर

विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी सोमवारी ३,८०९.९३ कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली होती. शेअर बाजार विश्लेषकांच्या मते, बाजारात चढ-उतार होत असला तरी गुंतवणूकदारांना आर्थिक मंदी येण्याची भीती आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आगामी पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो दर कमी करण्याचे संकेत दिले आहेत.

हेही वाचा-कोरोनाने अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम टाळण्यासाठी आरबीआयकडे सर्व पर्याय तयार

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशामध्ये १२५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर जगभरात कोरोनामुळे ७ हजार जणांचा मृत्यू झाला आहे.

Last Updated : Mar 17, 2020, 4:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.