ETV Bharat / business

शेअर बाजारातील पडझडीचे सत्र सुरुच; निर्देशांकात ९५ अंशाची घसरण

अमेरिकेने चीनच्या उत्पादनांवरील आयात शुल्क १० ते २५ टक्के वाढविण्याचा आज निर्णय घेतला आहे.  महाशक्ती असलेल्या दोन देशांतील व्यापारी युद्धामुळे जगभरातील गुंतवणुकदारांची चिंता वाढली आहे.

मुंबई शेअर बाजार
author img

By

Published : May 10, 2019, 7:33 PM IST

मुंबई - सकाळच्या सत्रात सकारात्मक सुरुवात होऊनही बंद होताना शेअर बाजाराच्या निर्देशांकात घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ९५ अंशाने घसरुन ३७,४६२ वर बंद झाला. तर निफ्टीच्या निर्देशांकात २२.९० अंशाची घसरण होऊन ११,२७८ वर बंद झाला.

स्टेट बँक ऑफ इंडियाला चौथ्या तिमाहीत ८८३ कोटींचा नफा झाला आहे. यानंतर एसबीआयच्या शेअरमध्ये २.९४ टक्के वाढ झाली. भारती एअरटेल व आयसीआयसीआयचे शेअरही वधारले. अमेरिकेने चीनच्या उत्पादनांवरील आयात शुल्क १० ते २५ टक्के वाढविण्याचा आज निर्णय घेतला आहे. महाशक्ती असलेल्या दोन देशांतील व्यापारी युद्धामुळे जगभरातील गुंतवणुकदारांची चिंता वाढली आहे. अमेरिकेच्या आयात शुल्काच्या निर्णयाला प्रत्युत्तर म्हणून चीनदेखील आयात शुल्क वाढविण्याची शक्यता आहे.

Intro:

हिंगोली- गोवंशबंदितही गोवंश हत्या सुरू आहे. शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता कळमनुरी - हिंगोली रोडवरील सावरखेडा येथे ट्रकमध्ये गोवंशिय प्राण्यांच्या सांगाड्यांची वाहतूक करणारा ट्रक ग्रामस्थांनी पकडला. ग्रामस्थांनी वाहनाला अडवून वाहनाची प्रचंड तोडफोड केली. त्यामुळे या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. जवळपास एक तास वाहतूक खोळंबा झाला होता.

Body:हिंगोली हुन नांदेडकडे एका ट्रकमधून गोवंश प्राण्यांचे सांगाडे जात असल्याची माहिती सावरखेडा येथील ग्रामस्थांना मिळाली. ग्रामस्थांनी सदर ट्रक अडवून ट्रकमधील सांगाड्याची पाहणी केल्यानंतर सुमारे १०० च्यावर प्राण्यांचे सांगाडे असल्याची खात्री ग्रामस्थांना पटली. नंतर ग्रामस्थांनी आपला रोष व्यक्त करीत सदर वाहनावर प्रचंड दगडफेक केली. यात वाहनाच्या समोरील सर्व काचा फोडल्या. या घटनेने हादरलेल्या वाहन चालक अन त्याच्या सहकाऱ्याने घटनास्थळावरून पळ काढला. रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांवर प्रचंड दगड फेक होत असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहने जागीच थांबली होती. या प्रकाराने हिंगोली- कळमनुरी रस्त्यावर सुमारे १ तास वाहतूक सेवा कोलमडली. हिंगोली व बासंबा पोलिसांना याबाबत माहिती मिळताच पोलिसानी घटनास्थळी धाव घेतली. अन वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. त्यानंतर सदर प्राण्यांचे सांगाडे वाहून येणाऱ्या ट्रकला ताब्यात घेत पोलिसांनी बासंबा पोलीस ठाण्यात नेले.

*वाहनांची माहिती ग्रामस्थांना मिळालीच कशी* तर्क वितरक

गोवंशीय सांगडे घेऊन येणारे वाहन नांदेडमार्गाने स जात असल्याबद्दल ची माहिती सावरखेडा येथील ग्रामस्थांना मिळालीच कशी? नंतर अचानक एवढा उद्रेक झाला कसा? याबद्दल जिल्ह्यात तर्कवितर्क लावले जात आहेत. सदर माहिती ही ग्रामस्थांना पोलिसांनी तर दिली नसावी का याबद्दलही तर्कवितर्क आहे. या घटनेमुळे हिंगोली कळमनुरी रस्त्यावर निर्माण झालेल्या कायदा व सुव्यवस्थेला जबाबदार कोण? असा ही प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. जवळपास दोन ते तीन किमी रांगा लागलेले वाहन चालक चांगलेच ताटकळत बसले होते. Conclusion:या प्रकरणी बसंबा पोलीस ठाण्यात वाहन चालका विरुद्धच गुन्हा दाखल केला आहे. मात्र वाहनाचे नुकसान झाल्याप्रकणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे या घटनेची जिल्ह्यात एकच चर्चा रंगली होती.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.