मुंबई - शेअर बाजार निर्देशांक ७१ अंशाने घसरून ४०,९३८.७१ वर स्थिरावला. उर्जा, एफएमसीजी आणि ऑटो कंपन्यांचे शेअर घसरल्याने शेअर बाजार निर्देशांकात घसरण झाली.
मुंबई शेअर बाजार खुला होताना वधारला. त्यानंतर शेअर बाजाराने ४१,१८५.०३ हा आजपर्यंतचा सर्वोच्च निर्देशांक नोंदविला. एफएमसीजी, ऑटो, उर्जा आणि काही बँकांचे शेअर घसरून नंतर वधारले. मुंबई शेअर बाजार निर्देशांक ७०.९९ अंशाने घसरून ४०,९३८.७२ वर पोहोचला. निफ्टीचा निर्देशांक ३२.७५ अंशाने घसरून १२,०५३.९५ वर स्थिरावला.
हेही वाचा-अर्थव्यवस्थेचा विकासदर कमी होत असल्याचे पाहून वेळेआधीच रेपो दरात कपात
या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर-
आयटीसी कंपनीचे सर्वात अधिक १.९७ टक्क्यांनी शेअर घसरले. टाटा स्टील १.८० टक्के, हिंदुस्थान युनिलिव्हरचे १.५७ टक्के, वेदांत १.४४ टक्के, भारती एअरटेल १.३७ टक्के आणि एम अँड एमचे १.३५ टक्के असे शेअर घसरले. टीएसीएसचे २.७० टक्के, टेक महिंद्रा १.६० टक्के, एचसीएल टेक १.५७ टक्के, एचडीएफसी ०.८३ टक्के आणि कोटक बँकेचे ०.७३ टक्के असे शेअर वधारले.
हेही वाचा-घाऊक बाजारातील महागाईत नोव्हेंबरमध्ये ०.५८ टक्क्यांची वाढ
अमेरिका आणि चीनमधील व्यापारी युद्ध शमल्याने जगभरातील गुंतवणूकदार उत्साहित झाले. मात्र, निराशाजनक आर्थिक आकडेवारी जाहीर असल्याने शेअर बाजारात घसरण झाली.
घाऊक बाजारातील महागाईत नोव्हेंबरमध्ये ०.५८ टक्क्यांची वाढ-
सर्वसामान्यांना घाऊक बाजारातील महागाईत नोव्हेंबरमध्ये ०.५८ टक्क्यांची वाढव्हेंबरमध्ये किरकोळ बाजारपेठेतील महागाईपाठोपाठ घाऊक बाजारपेठेतील महागाईला तोंड द्यावे लागले. हे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या आकडेवारीतून समोर आले आहे. वार्षिक महागाई दराच्या तुलनेत घाऊक बाजारपेठेतील महागाई नोव्हेंबरमध्ये ०.५८ टक्क्यांनी वाढली.