ETV Bharat / business

मुंबई शेअर बाजार निर्देशांकात १३६ अंशाने घसरण; 'या' कंपन्यांच्या शेअरला फटका - मुंबई शेअर बाजार निर्देशांक न्यूज

मुंबई शेअर बाजाराच्या घसरणीनंतर निफ्टीच्या निर्देशांकातही घसरण झाली आहे. निफ्टीचा निर्देशांक २८.४० अंशाने घसरून ११,६४२.४० वर स्थिरावला.

मुंबई शेअर बाजार
मुंबई शेअर बाजार
author img

By

Published : Oct 30, 2020, 7:05 PM IST

Updated : Oct 30, 2020, 7:57 PM IST

मुंबई - बाजार विश्लेषकांच्या मते कोरोनाच्या रुग्णांच्या वाढती संख्या आणि अमेरिकेच्या निवडणुकीमुळे निर्माण झालेली अस्थिरता आज शेअर बाजार अस्थिर राहिला आहे. शेअर बाजाराचा निर्देशांक १३६.७८ अंशाने घसरून ३९,६१४.०७ वर स्थिरावला. इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक आणि भारती एअरटेलचे शेअर घसरले आहेत.

मुंबई शेअर बाजाराच्या घसरणीनंतर निफ्टीच्या निर्देशांकातही घसरण झाली आहे. निफ्टीचा निर्देशांक २८.४० अंशाने घसरून ११,६४२.४० वर स्थिरावला.

या कंपन्यांचे शेअर घसरले-वधारले

भारती एअरटेलचे शेअर सुमारे ४ टक्क्यांनी घसरले. त्यापाठोपाठ मारुती, बजाज फायनान्स, एचयूएल, आयसीआयसीआय बँक आणि कोटक बँकेचे शेअर घसरले. टाटा स्टील, एनटीपीसी, सन फार्म, नेस्ले इंडिया, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टीसीएसचे शेअर वधारले.

या कारणाने शेअर बाजारात अस्थिरता-

एलकेपी सिक्युरिटीजचे मुख्य संशोधक एस. रंगनाथन म्हणाले, की दिवसभरात शेअर बाजार अत्यंत अस्थिर राहिला आहे. असे असले तरी दुपारनंतर रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर वधारल्याने बाजार सावरण्यास मदत झाली.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ०.५८ टक्क्यांनी वधारून प्रति बॅरल ३८.४८ डॉलरवर पोहोचले.

Last Updated : Oct 30, 2020, 7:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.