मुंबई - शेअर बाजार निर्देशांक सकाळच्या सत्रात १५० अंशाने घसरला. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमधील घसरण झाल्याने शेअर बाजारात घसरण झाली आहे. एचडीएफसी बँक आणि इन्फोसिसच्या फ्युच्युअर शेअरची मुदत संपल्यानेही शेअर बाजारात नकारात्मक चित्र निर्माण झाले.
शेअर बाजार खुला होताना १८१ अंशाने निर्देशांक वधारला. त्यानंतर घसरण होत शेअर बाजार १६८.६१ अंशाने घसरून ४१,०३०.०५ वर पोहोचला. निफ्टीचा निर्देशांक ४१.६५ अंशाने घसरून १२,०८७.८५ वर पोहोचला.
हेही वाचा-अर्थसंकल्प २०२० : अधिक तरतूद करण्याची दुग्धोत्पादन क्षेत्राची मागणी
मागील सत्रात मुंबई शेअर बाजार २३१.८० अंशाने वधारून ४१,१९८.६६ वर पोहोचला होता. तर निफ्टीचा निर्देशांक ७३.८० अंशाने वधारून १२,१२९.५० वर पोहोचला होता. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी १,०१४.२७ कोटी रुपयांच्या शेअरची बुधवारी विक्री केली. तर देशातील गुंतवणूकदार संस्थांनी १,५२०.९० कोटी रुपयांच्या शेअरची बुधवारी खरेदी केली.
हेही वाचा-भाजपमधील 'या' चार चेहऱ्यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाला दिली गती
चीनमधील कोरोना विषाणुमुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर तसेच आशियातील शेअर बाजारावर परिणाम होण्याची भीती आहे. हाँगकाँग, जपान, दक्षिण कोरियामधील शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. तर चीनमधील शेअर बाजार बंद राहिला आहे.