मुंबई - शेअर बाजार निर्देशांकात सकाळच्या सत्रात १०० अंशाने घसरण झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक आणि इन्फोसिसच्या शेअरचे दर कमी झाले आहेत.
मुंबई शेअर बाजार खुला होताच निर्देशांक वधारला होता. त्यानंतर शेअर बाजाराने 'यू टर्न' घेतल्याने निर्देशांक १२३.२२ अंशाने घसरून ४०,०२२.२८ वर पोहोचला. निफ्टीचा निर्देशांकही २९.६५ अंशाने घसरून ११,७३८.१० वर पोहोचला.
या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर
आयसीआयसीआय बँकेचे शेअर सुमारे ३ टक्क्यांनी घसरले. त्यापाठोपाठ ओएनजीसी, एसबीआय, एचडीएफसी, इन्फोसिस आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर घसरले. तर कोटक बँकेचे शेअर सुमारे ६ टक्क्यांनी वधारले. एनटीपीसी, नेस्ले इंडिया, एशियन पेंट्स, टेक महिंद्रा आणि एम अँड एमचेही शेअर वधारले.
येत्या काही दिवसात शेअर बाजार अस्थिर राहण्याची शक्यता-
विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी सोमवारी ११९.४२ कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. रिलायन्स सिक्युरिटीजचे प्रमुख अर्जुन यश महाजन (संस्थात्मक व्यवसाय) म्हणाले, की अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजार अस्थिर राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ०.५४ टक्क्यांनी वधारून ४१.०३ प्रति बॅरल झाले आहेत.
मागील सत्रात मुंबई शेअर बाजार ५४० अंशाने घसरून ४०,१४५.५० वर स्थिरावला होता. तर निफ्टीचा निर्देशांक १६२.६० अंशाने घसरून ११,७६७.७५ वर स्थिरावला होता.