मुंबई - शेअर बाजार बंद होण्यापूर्वी निर्देशांक १५५ अंशाने घसरला. बँकांच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाल्याने शेअर बाजार ढासळला आहे.
मुंबई शेअर बाजारातील १९ क्षेत्रांपैकी १३ क्षेत्रातील शेअर बाजार बंद होण्यापूर्वी घसरले. तर सहा क्षेत्रांचे शेअर वधारले.
या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर
येस बँकेचे सर्वात अधिक १५ टक्क्यांनी शेअर घसरले. तर इंडसइंड बँक, एसबीआय, आयसीआयसीआय बँक, सन फार्मा, एचडीएफसी आणि अॅक्सिस बँकेचे शेअर ६.८४ टक्क्यांनी घसरले. भारती एअरटेलचे शेअर सर्वात अधिक ५.२९ टक्क्यांनी वधारले. तर आयटी कंपन्या एचसीएल टेक, टीसीएस आणि इन्फोसिसचे शेअर बंद होण्यापूर्वी वधारले.
हेही वाचा-ऑस्ट्रेलियाच्या 'या' राज्यात कार्यालय असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया ठरली पहिली बँक
बँकांचे शेअर सर्वात अधिक २.६२ टक्क्यांनी घसरले. त्यानंतर वित्तीय कंपन्यांचे २.४४ टक्क्यांनी तर स्थावर मालमत्ता कंपन्यांचे १.६३ टक्क्यांनी शेअर घसरले. तर दूरसंचार कंपन्यांचे शेअर सर्वात अधिक ४.६० टक्क्यांनी वधारले आहेत. तर आयटी कंपन्यांचे शेअर २.६२ टक्क्यांनी वधारले. भारतीय रिझर्व्ह बँकेची पतधोरण समिती ४ ऑक्टोबर पतधोरण जाहीर करणार आहे. याकडे गुंतवणुकदारांचे लक्ष लागलेले आहे.
हेही वाचा-भारतीय रिझर्व्ह बँक सलग पाचव्यांदा ४ ऑक्टोबरला रेपो दरात कपात करण्याची शक्यता