मुंबई - शेअर बाजारात सलग सहाव्या दिवशी घसरण सुरू राहिली आहे. मुंबई शेअर बाजार सकाळच्या सत्रात १,१०० अंशांनी घसरल्यानंतर सावरला नाही. शेअर बाजार निर्देशांक १,४४८ अंशांनी घसरून ३८,२९७.२९ वर स्थिरावला.
कोरोना विषाणुमुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची भीती आहे. जगभरातील शेअर बाजारांच्या पडझडीनंतर मुंबई शेअर बाजाराने मोठी घसरण अनुभवली आहे. निफ्टीचा निर्देशांक ४३१.५५ अंशांनी घसरून ११,२०१.७५ वर स्थिरावला.
संबधित बातमी वाचा-कोरोना संसर्ग महागात ; दलाल स्ट्रीटवरील गुंतवणूकदारांचे ५ लाख कोटी पाण्यात
या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर
टेक महिंद्राचे सर्वाधिक शेअर घसरले आहेत. त्या पाठोपाठ टाटा स्टील, महिंद्रा अँड महिंद्रा, एचसीएल टेक, इन्फोसिस, एसबीआय आणि बजाज फायनान्सचे शेअर घसरले आहेत.
चीनमधील कोरोनामुळे जगभरातील ८३,००० जणांना रोगाची बाधा झाली आहे. तात्पुरत्या आकडेवारीनुसार आठवडाभरातच शेअर बाजार गुंतवणूकदारांनी ९,३८९ कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली आहे. डॉलरच्या तुलनेत ५५ पैशांनी घसरून रुपयाचे मूल्य ७२.१६ झाले आहे. शेअर बाजार गुंतवणूकदारांनी सकाळी सुमारे पाच लाख कोटी रुपये गमाविले आहेत.
हेही वाचा-एजीआर शुल्काची दूरसंचार कंपन्यांवर टांगती तलवार कायम, कारण...