ETV Bharat / business

Share Market Collapse : शेअर बाजार १४०० अंकांनी गडगडला.. गुंतवणूकदारांना सहा लाख कोटींचा फटका - Share Market sensex crashes

आज शेअर बाजार (Share Market) घसरणीसह सुरू झाला. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण झाली. सेन्सेक्समध्ये 1400 अंकानी घसरला. (Share Market Collapse) तर, निफ्टीदेखील (Nifty) 448 अंकांनी घसरला. कोरोनाचा नवीन वेरिएंट आढळल्याच्या वृत्ताचा शेअर बाजारावर परिणाम झाला असल्याचा म्हटले जात आहे. मार्च 2020 सारखी परिस्थिती पुन्हा निर्माण होईल अशी भीती गुंतवणुकदारांमध्ये निर्माण झाल्याने बाजारात घसरण सुरू असल्याचे म्हटले जात आहे.

Sensex crashes
Sensex crashes
author img

By

Published : Nov 26, 2021, 5:28 PM IST

मुंबई - शुक्रवारचा दिवस शेअर बाजारासाठी अत्यंत वाईट दिवस ठरला शेअर बाजाराचा निर्देशांक सुमारे 1400 अंकांनी कोसळला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना सुमारे सहा लाख कोटी रुपयांचा फटका बसल्याचे तज्ञांचे मत आहे. मात्र, भारतीय गुंतवणूकदारांसाठी ही एकप्रकारे चांगली संधी असल्याचे मतही जाणकारांनी व्यक्त केले आहे.

शेअर बाजाराचा निर्देशांक(Share Market sensex crashes) तब्बल चौदाशे अंकांनी कोसळला आहे. सेन्सेक्स निफ्टी जोरदार आपटले आहेत. सकाळी सेन्सेक्स ५४०.३ अंशांनी घसरून ५८,२५४.७९ वर उघडला. त्यानंतर ही घसरण १४८८ अंकांपर्यंत खाली गेली. तर दुसरीकडे निफ्टी मध्येही जोरदार घसरण होत ४४८.५ अंशांनी निफ्टी पडला आहे. कोबिड १९ चा नवीन व्हेरीएंट आढळल्यामुळे ही घसरण झाली असावी, अशी शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. यामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो, अशी भीती तज्ज्ञ व्यक्त करीत असल्याने गुंतवणूकदारांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. सध्या सेन्सेक्स १४६९.२३ अंकांनी घसरून ५७,३२५.८६ अंकांवर स्थिरावला आहे तर निफ्टी ४५५.५५ अंकांनी घसरून असून १७.०८०.७० अंकांवर कामकाज करीत आहे.

वाहन कंपन्यांना सर्वाधिक फटका -

शेअर बाजार कोसळल्याने (Share Market sensex ) त्याचा सर्वाधिक फटका वाहन कंपन्यांना झाला आहे. सर्वात जास्त घसरण टाटा मोटर्स चा शेअर्समध्ये दिसून आली. टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये ५.३३ टक्के घट दिसून आली तर मारुती कंपनीच्या शेअरमध्ये ४.१७ टक्के घट पाहायला मिळाली. ओ एन जी सी च्या शेअर्समध्ये चार टक्के घसरण झाली असून टाटा स्टीलचा शेअर्स ३.८५ टक्क्यांनी घसरला आहे.

शेअर बाजार कोसळण्याची तीन कारणे -

दक्षिण आफ्रिकेत कोरोनाविषाणू चा एक नवीन प्रकार आढळल्याची माहिती समोर आली आहे हा प्रकार समोर आल्यानंतर केंद्र सरकारच्या आरोग्य सचिवांनी भारतात येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांची सखोल कोरूना चाचणी करण्याचे निर्देश जारी केले आहेत याचा परिणाम शेअर बाजारावर दिसून आला. तर विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी देशांतर्गत सर्व भागांमध्ये केलेली विक्री हेसुद्धा एक कारण आहे. या विक्रीमुळे गुंतवणूकदारांचा उत्साह ओसरला आहे. दरम्यान सर्व आशियाई बाजारांमध्ये घसरनींचा कल दिसत असून त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारावरही होतो आहे.

ही तर भारतीय गुंतवणूकदारांसाठी संधी - झुनझुनवाला

दरम्यान, बाजारातली आजची घसरण ही एक प्रकारे संधी असल्याचे मत शेअर ब्रोकर निरज झुनझुनवाला यांनी व्यक्त केले आहे. बाजारासाठी हे आवश्यक असून भारतीय गुंतवणूकदारांनी या संधीचा आता फायदा घ्यावा असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.