गुरुग्राम - सॅमसंग इंडियाने शुक्रवारी गॅलेक्सी श्रेणीमधील एस १० प्लस, एस १० आणि एस १० ई या स्मार्टफोनवर खास ऑफर जाहीर केली आहे. या स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना २० हजार रुपयापर्यंत कॅशबॅक म्हणजे तेवढी सवलत मिळणार आहे.
ग्राहकांना ५१२ जीबीचा गॅलेक्सी एस १० घेतल्यास २० हजार रुपयांची सवलत मिळणार आहे. तर १२८ जीबीचा एस १० घेतल्यास १२ हजार रुपयांची सवलत मिळणार आहे. मोठा डिसप्ले असलेला ५१२ जीबी व १२८ जीबीचा गॅलक्सी एस १० प्लस घेतल्यास १२ हजार रुपयांची सवलत मिळणार आहे. तर गॅलक्सी एस १० ईवर ग्राहकांना ८ हजार रुपयांची सवलत मिळणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
हेही वाचा-१०० मार्गांवर रेल्वेचे खासगीकरण, नीती आयोगाचा प्रस्ताव
हे आहेत फीचर्स-
एस १० ई या स्मार्टफोनला ५.८ इंचचा डिसप्ले, गॅलक्सी एस १० ला ६.१ इंचचा डिसप्ले आहे. तर गॅलक्सी एस१० प्लसला ६.४ इंचचा डिसप्ले आहे. या स्मार्टफोनला डायनॅमिक एएमओएलईडी डिसप्ले आहे. गॅलक्सी एस१० एचडीआर १० प्लसला डिजीटल कंटेन आणि डायनॅमिक टोन मॅपिंग आहे. यामध्ये अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. यामध्ये थ्रीडी ठसा ओळखण्याची क्षमता आहे. त्यामुळे स्मार्टफोन अधिक सुरक्षित राहू शकतो. स्मार्टफोनवरील सवलती ही ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही प्रकारे ग्राहकांना घेता येणार आहेत. ही ऑफर ४ जानेवारी ते ३१ जानेवारीपर्यंत उपलब्ध असणार आहे.