मुंबई - कोरोनाचा प्रसार वाढत असताना भारतीय चलनाच्या आर्थिक आरोग्यावरही परिणाम झाला आहे. रुपयाची सकाळच्या सत्रात मोठी घसरण झाली आहे. डॉलरच्या तुलनेत ७० पैशांनी घसरून रुपयाचे मूल्य ७४.९६ झाले आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशात कोरोना बाधितांची संख्या १६९ झाली आहे. कोरोनामुळे जागतिक व भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल, अशी गुंतवणूकदारांना भीती असल्याचे ट्रेडर्सने सांगितले. दरम्यान, कोरोनामुळे जगभरात सुमारे ९ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर लाखो लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.
गेली काही दिवस शेअर बाजारात घसरण सुरू आहे. रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत बुधवारी ७४.२६ रुपये होते. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी बुधवारी भांडवली बाजारामधून ५ हजार ८५.३५ कोटी रुपये काढून घेतले आहेत.