ETV Bharat / business

व्यापार मागोवा २०१९ : मंदीने आयपीओच्या एकूण निधीत ६० टक्के घसरण - प्रारंभिक भागविक्री

भांडवली बाजारात आलेल्या १६ आयपीओपैकी १० आयपीओला गुंतवणुकदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आयआरसीटीसीच्या आयपीओला १०९ पट तर उज्जवन स्मॉल फायनान्स बँकेला १०० पट गुंतवणुकदारांनी प्रतिसाद दिला.

Slowdown affects on IPO
मंदीने आयपीओवर परिणाम
author img

By

Published : Dec 26, 2019, 7:40 PM IST

मुंबई - मंदावलेल्या अर्थव्यवस्थेचा भांडवली बाजारातील कंपंन्यांच्या प्रारंभिक भागविक्रीवर (आयपीओ) परिणाम झाला . वर्ष २०१९ मध्ये १२ हजार ३६२ कोटी रुपयांच्या आयपीओची विक्री झाली. हे प्रमाण गतवर्षीच्या आयपीओ विक्रीहून ६० टक्के कमी आहे. गतवर्षी ३० हजार ९५९ कोटी रुपयांच्या आयपीओची विक्री झाली.

सरत्या वर्षात १६ आयपीओची विक्री झाली. तर गतवर्षी २४ आयपीओची विक्री झाली होती. चालू वर्षात भांडवली बाजारात एकूण भांडवल निधी हा ८१ हजार १७४ कोटी रुपये राहिला आहे. हे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत २८ टक्क्यांनी अधिक आहे. गतवर्षी एकूण भांडवल निधी हा ६३,६५१ कोटी रुपये होता.

हेही वाचा-रेल्वे सेवांच्या विलिनीकरणानंतरही अधिकाऱ्यांची सेवाज्येष्ठता राहणार अबाधित

स्टर्लिंग आणि विल्सन सोलरने सर्वात मोठा आयपीओ भांडवली बाजारात आणला होता. त्यामधून २ हजार ८५० कोटी रुपये जमविले. या आयपीओचे सरासरी आकारमूल्य हे ७७३ कोटी रुपये होते. भांडवली बाजारात आलेल्या १६ आयपीओपैकी १० आयपीओला गुंतवणुकदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आयआरसीटीसीच्या आयपीओला १०९ पट तर उज्जवन स्मॉल फायनान्स बँकेला १०० पट गुंतवणुकदारांनी प्रतिसाद दिला.

हेही वाचा-घटलेल्या महसुलाने प्राप्तिकरात अतिरिक्त सवलती मिळण्याची शक्यता कमी

ऑनलाईन रेल्वे तिकिटे, पर्यटन आणि खानपानाची सुविधा देणारी आयआरसीटीसीचा मुंबई शेअर बाजारातील प्रवेश प्रचंड यशस्वी ठरला. आयआरसीटीच्या प्रति शेअरची किंमत पहिल्याच दिवशी ३२० रुपयावरून ६४४ रुपये झाली होती.

हेही वाचा-गावांना मार्च २०२० पर्यंत मोफत वायफाय सेवा - रवीशंकर प्रसाद

Intro:Body:

Dummy news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.