नवी दिल्ली - किरकोळ बाजारपेठेतील महागाईत ऑगस्टमध्ये अंशत: घसरण झाली आहे. ऑगस्टमध्ये किरकोळ बाजारपेठेत महागाईचे प्रमाण घसरून ६.६९ टक्के झाले. विशेषत:, अन्नाच्या किमती वाढूनही किरकोळ बाजारपेठेत महागाईचे प्रमाण कमी झाले आहे.
किरकोळ बाजारपेठेतील महागाईचे जुलैमध्ये ६.७३ टक्के प्रमाण राहिले होते. यापूर्वी केंद्र सरकारने जुलैमध्ये किरकोळ बाजारपेठेत महागाईचे प्रमाण ६.९३ टक्के राहील, असा अंदाज व्यक्त केला होता. अन्नाच्या वर्गवारीत महागाईचे प्रमाण जुलैमध्ये ९.६२ टक्के राहिले आहे. तर, अन्नाच्या वर्गवारीत महागाईचे प्रमाण ऑगस्टमध्ये घसरून ९.०५ टक्के झाले आहे. ही आकडेवारी ग्राहक किंमत निर्देशांक आकडेवारीतून समोर आली आहे.
हेही वाचा-टिकटॉकच्या खरेदीचा फिस्कटला सौदा; मायक्रोसॉफ्ट नव्हे 'ही' कंपनी आहे शर्यतीत
आरबीआयकडून पतधोरण जाहीर करताना किरकोळ बाजारपेठेतील महागाईची आकडेवारी विचारात घेतली जाते. केंद्र सरकारने किरकोळ बाजारपेठेतील महागाईचे प्रमाण जास्तीत जास्त ४ टक्के तर कमी कमी २ टक्के ठेवणे आरबीआयला बंधनकारक केले आहे.
हेही वाचा-'कोरोनामध्ये आत्मनिर्भर व्हा ! स्वत:चे जीव स्वत:च वाचवा, पंतप्रधान मोरांबरोबर व्यस्त आहेत'