नवी दिल्ली - चिनी स्मार्टफोन कंपनी रिअलमीने देशातील पहिला ५ जी स्मार्टफोन लाँच केला आहे. 'एक्स ५० प्रो ५जी' असे या मॉडेलचे नाव आहे. याची भारतात ३७,९९९ रुपये किंमत आहे.
रिअलमीने ५ जी स्मार्टफोन हे दोन रंगांमध्ये आणि तीन श्रेणीत उपलब्ध केले आहेत. ३७,९९९ रुपये (६जी +१२८जीबी), ३९,९९रुपये (जीबी+१२८जीबी) आणि ४४,९९ रुपये (१२ जीबी+२५६जीबी) हे मॉडेल फ्लिपकार्ट आणि रिअलमीवर सोमवारी सायंकाळी ६ वाजल्यापासून उपलब्ध होणार आहेत.
स्मार्टफोनमध्ये ६.४४ इंचचा सुपर -एएमओएलईडी डिसप्ले आहे. त्यामध्ये मोबाईलच्या तुलनेत ९२ टक्के स्क्रीन आहे. फोनमध्ये क्वालकोम्न स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसर आहे. त्याबरोबर अॅ़ड्रेनो ६५० जीपीयू व अँडाईड १० वर चालणारा रिअलमी यूआय आहे.
हेही वाचा-शेअर बाजारात ८०७ अंशांनी पडझड; कोरोनाच्या वाढत्या प्रसाराने गुंतवणूकदार चिंतेत
स्मार्टफोनला समोरील कॅमेरा (क्वाड कॅमेरा) ६४ मेगापिक्सेलचा आहे. तर पाठीमागील दोन कॅमेरे आहेत. समोरील कॅमेरा १२ मेगापिक्सेल टेलिफोटो कॅमेरा आहेत. त्याची २०X झूमची क्षमता आहे. तर ८ मेगापिक्सेलचा कॅमेरा आणि २ मेगापिक्सेलचा पोट्रेट सेन्सेर आहे.
हेही वाचा-सोन्याच्या किमतीने गाठला आजपर्यंतचा उच्चांक; जाणून घ्या वाढलेले दर
अल्ट्रा वाईड अँगलचे दोन कॅमेरे समोरील बाजूस आहेत. त्यामध्ये ३२ मेगापिक्सेलचे सोनी आयएमएक्स ५१६ चे सेन्सर आहेत. ८ मेगा पिक्सेलचा अल्ट्रा वाई़ड अँगल लेन्सचा कॅमेरा आहे.
दोन्ही कॅमेरामधील सेल्फी हे एचडीआरमध्ये आहेत. तसेच त्यामध्ये नाईटस्केपची योजना आहे. चित्रीकरण करण्यासाठी सुपर व्हिडिओ स्थिरीकरण हे तंत्रज्ञान आहे. मोबाईलमध्ये ४२०० च्या दोन बॅटऱ्या आहेत. यामध्ये वेगाने चार्जिंग करणारी फ्लॅश चार्जिंग टेक्नॉलॉजी आहे.