नवी दिल्ली- रेल्वेला दूरसंचार क्षेत्राच्या पायाभूत सेवा देणाऱ्या रेलेटेल कॉर्पोरेशनच्या प्रारंभिक भागविक्रीला मोठे यश मिळाले आहे. रेलेटेल आयपीओच्या खरेदीसाठी पहिल्याच दिवशी गुंतवणुकदारांनी २.६४ टक्क्यांनी अधिक अर्जभरणा केला आहे.
१६ कोटी १३ लाख ७४ हजार २२० शेअरसाठी ८१९.२४ कोटींच्या बोली मिळाल्या आहेत. प्रत्यक्षात रेलटेलची ६ कोटी १८ लाख ९५ हजार ९२३ शेअरची ऑफर आहे. बिगर संस्थात्मक गुंतवणुकदारांनी ७५ टक्क्यांहून अधिक अर्जभरणा केला आहे. तर किरकोळ वैयक्तिक गुंतवणुकदारांनी (आरआयआयएस) ४.९९ टक्क्यांहून अधिक अर्जभरणा केला आहे.
हेही वाचा-कोरोनाविरोधातील लढ्याकरता आनंद महिंद्रा यांनी सरकारला दिला 'हा' महत्त्वपूर्ण सल्ला
८ कोटी ७१ लाख ५३ हजार ३६९ कोटी रुपयांच्या शेअरसाठी प्रत्येकी किंमत ९३ ते ९४ रुपये आहे. कंपनीने १४ अँकरमधून २४४ कोटी रुपयांची गुंतवणूक मिळविली आहे. देशातील एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स कंपनी, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एमएफ, आदित्य बिर्ला सन लाईफ इन्शुरन्स, टाटा एमएफ, इडेलवायजेस एआयएफ यांनीही अँकर गुंतवणुकदार म्हणून भाग घेतला होता. या आयपीओचे व्यवस्थापन आयसीआयसीआय सिक्युरिटीज, आयडीबीआय कॅपिटल मार्केट्स अँड सिक्युरिटीज लि. आणि एसबीआय कॅपिटल मार्केट्स लि. या कंपन्यांकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा-सोन्याच्या दरात किंचित घसरण; चांदी प्रति किलो ९५ रुपयांनी महाग
काय काम करते रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ?
रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही भारतीय रेल्वे मंत्रालयाच्या अखत्यारित येणारी कंपनी आहे. ही कंपनी २००० साली दूरसंचार सेवा देण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे. रेलटेलमधून रेल्वेला अधिक कार्यक्षम व अद्ययावत बनवण्यासाठी देशभर इंटरनेट, दूरसंचार व मल्टिमीडियाच्या पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करण्यात येते.