नवी दिल्ली - दिवान हाउसिंग फायनान्स लिमिटेड (दिवान हाउसिंग फायनान्स लिमिटेड, डीएचएफएल)च्या एनपीए खात्यात 3,688.58 कोटी रुपयांच्या फसवणुकीची माहिती आरबीआयला दिल्याचे पंजाब नॅशनल बँकने (पीएनबी) सांगितले.
डीएचएफएल कंपनीने अनेक कंपन्यांमार्फत बँक कर्जाच्या एकूण 97, 000 हजार कोटींपैकी 31 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला होता, अशी माहिती एका अहवालाद्वारे समोर आली होती. तेव्हापासून डीएचएफएल कंपनी चर्चेत असून या कंपनीचे दिवाळे निघाले
बँकेने यापूर्वीच विहित निकषांतर्गत 1, 246.58 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गृहनिर्माण कर्ज देणाऱ्या डीएचएफएलला दिवाळखोरीच्या प्रक्रियेसाठी पाठविले होते. संभाव्य कर्ज निराकरणासाठी एनसीएलटीकडे जाणारे हे पहिले वित्तीय सेवा प्रकरण ठरले. तसेच कंपनीमध्ये गेल्यावर्षी नियमांचे उल्लंघन केल्याचे उघडकीस आल्यानंतर एसएफआयओसह विविध एजन्सींनी चौकशी सुरू केली होती.