नवी दिल्ली - गेल्या नऊ दिवसात आठव्यांदा पेट्रोल व डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. पेट्रोलच्या किमती शनिवारी दिल्लीत प्रति लिटर ८२ रुपयांहून अधिक आहेत. तर डिझेलच्या किमती प्रति लिटर ७२ रुपये आहेत.
दिल्लीत पेट्रोलच्या किमती प्रति लिटर २४ पैशांनी वाढल्या आहेत. तर डिझेलच्या किमती २७ पैसे प्रति लिटर वाढल्या आहेत. कोरोनावर लस येण्याची आशा असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत.
- सरकारी तेल कंपन्यांच्या माहितीनुसार दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रति लिटर ८२.१३ रुपये आहे. तर डिझेलची किंमत प्रति लिटर ७२.१३ रुपये आहे.
- पेट्रोल-डिझेलच्या किमती २० नोव्हेंबरपासून आठव्यांदा वाढल्या आहेत.
- गेल्या नऊ दिवसात पेट्रोलची किंमत प्रति लिटर १.०७ रुपयाने वाढ झाली आहे. तर डिझेलची किंमत प्रति लिटर १.६७ रुपयाने वाढ झाली आहे.
हेही वाचा-आर्थिक मंदी: देशाच्या अर्थव्यवस्थेचा जुलै-सप्टेंबर तिमाहीत उणे ७.५ टक्के विकासदर
२२ सप्टेंबरपासून २० नोव्हेंबरपर्यंत पेट्रोलच्या किमती स्थिर राहिले होते. तर डिझेलचे तर २ ऑक्टोबरपासून २० नोव्हेंबरपर्यंत स्थिर राहिले होते. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन या सरकारी तेल कंपन्यांकडून आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किमतीचा आढावा घेतला जातो. त्याप्रमाणे किरकोळ इंधनाच्या दरातील किमतीत बदल करण्यात येतात. पेट्रोल व डिझेलचे दर विविध राज्यांमध्ये व्हॅटच्या आकारणीप्रमाणे वेगवेगळे आहेत.
हेही वाचा-दिलासादायक! महामारीत एप्रिल ते सप्टेंबरमध्ये थेट विदेशी गुंतवणुकीत १५ टक्क्यांनी वाढ