नवी दिल्ली - डिझेल आणि पेट्रोलच्या किमती आज स्थिर राहिल्या आहेत. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती स्थिर राहिल्या आहेत. त्यामुळे सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर 'जैसे थे' ठेवले आहेत.
सलग चौथ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर राहिल्या आहेत. तर, पेट्रोलचे दर गेले १४ दिवस 'जैसे थे' राहिले आहेत. गेल्या काही आठवड्यांत कच्च्या तेलाचा दर हा १० टक्क्यांनी घसरला होता. गेल्या दोन दिवसांत कच्च्या तेलाचा दर वाढून प्रति बॅरल ४१.५ डॉलर झाला आहे.
कोरोनाच्या संसर्गाचे आणि मृत्यूचे प्रमाण जगभरात वाढत आहे. त्याचा कच्च्या तेलाच्या मागणीवर परिणाम झाला आहे. मागणी कमी झाल्याने कच्च्या तेलाचे दर कमी होत आहेत.
असे आहेत प्रति लिटर डिझेलचे महानगरामधील दर (रुपयांमध्ये)
- नवी दिल्ली - ७०.४६
- मुंबई - ७६.८६
- चेन्नई - ७५.९५
- कोलकाता - ७३.९९
असे आहेत प्रति लिटर पेट्रोलचे महानगरामधील दर (रुपयांमध्ये)
- नवी दिल्ली - ८१.०६
- मुंबई - ८७.७४
- चेन्नई - ८४.१४
- कोलकाता - ८२.५९