नवी दिल्ली - सलग चौथ्या दिवशी पेट्रोल व डिझेलचे दर वाढले आहेत. पेट्रोलच्या किमती दिल्लीत प्रति लिटर २९ पैसे तर डिझेलच्या किमती ३५ पैशांनी वाढल्या आहेत.
पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोल प्रति लिटर ८८.१४ रुपये तर डिझेलचा दर ७८.३८ रुपये आहे. देशभरात पेट्रोलचे दर प्रति लिटर २५ ते ३० पैशांनी वाढले आहेत. तर डिझेलचे दर प्रति लिटर ३० ते ३५ पैशांनी वाढले आहेत.
हेही वाचा-स्मार्टफोनवर वेळ घालविण्यात भारतीय लोक जगात प्रथम
- आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ६१ डॉलरहून अधिक झाले आहेत. त्यानंतर देशातील सार्वजनिक तेल कंपन्यांनीही पेट्रोल व डिझेलचे दर वाढविले आहेत.
- केंद्रीय अर्थसंकल्पात पेट्रोलियम उत्पादनांवर कृषी पायाभूत आणि विकास उपकर लावण्यात आला आहे. मात्र, त्याचा सर्वसामान्यांवर भार पडणार नसल्याचा दावा केंद्र सरकारकडून करण्यात आला.
- सौदी अरेबियाने जागतिक बाजारातील कच्च्या तेलाचे उत्पादन कमी केले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत.
- चालू वर्षात पेट्रोलचे दर १६ वेळा वाढविल्याने पेट्रोल ४.४३ रुपयांनी महागले आहे. तर डिझेल ४.५१ रुपयांनी महागले आहे.
हेही वाचा-चंदा कोचर यांना ईडी विशेष न्यायालयाकडून पाच लाखांचा जामीन मंजूर